‘या’ ५ ग्रुमिंग टिप्सने पुरुष दिसतील स्मार्ट आणि हँडसम, आवश्य अजमावून पहा

‘या’ ५ ग्रुमिंग टिप्सने पुरुष दिसतील स्मार्ट आणि हँडसम, आवश्य अजमावून पहा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरूषसुद्धा आपले सौंदर्य वाढविण्यासाठी नेहमी विविध प्रकारचे उपाय करत असतात. तसेच काळजी घेत असतात. परंतु, अनेकदा चूकीचे प्रॉडक्ट आणि उपायांमुळे त्यांची निराशा होते. तरुणांनी योग्य उपाय केल्यास ते हँडसम दिसू शकतात. शिवाय त्यांची त्वचा अधिक सुंदर आणि आकर्षक होऊ शकते. यासाठी आपण खास पाच उपाय जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा

झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑइल लावा. तसेच अंघोळीनंतर बदामाच्या तेलाने मसाज करा.

हिवाळ्यात बॉडीलोशन आणि उन्हाळ्यात घराबाहेर निघण्यापुर्वी सनस्क्रीन लोशन लावा.

आठवड्यात दोन वेळा चेहरा स्क्रब करा. यामुळे घाण स्वच्छ होते.

शेविंगनंतर क्रीम किंवा लोशन लावा. अंघोळीनंतर क्रीम लावा. हिवाळ्यात त्वचेकडे विशेष लक्ष द्या.

त्वचा स्वच्छ ठेवा. पुरूषांची तेलग्रंथी खुप सक्रिय असल्याने त्वचेवर ब्लॅकहेड्स येतात आणि स्किन ऑयली होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु