‘मेडिटेशन’ करणे आरोग्यासाठी फायदेशीर ; ‘हे’ ५ आहेत फायदे

‘मेडिटेशन’ करणे आरोग्यासाठी फायदेशीर ; ‘हे’ ५ आहेत फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये चांगली झोप, व्यवस्थित आहार, व्यायामासाठी कोणालाच वेळ नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात अशांतता निर्माण होते. आपले कुठेही लक्ष लागत नाही आणि  प्रत्येक गोष्टीवरून चिडचिड होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे मेडिटेशन आहे. फक्त यासाठी आपल्याला आपला थोडा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे आज आपण मेडिटेशन करण्याचे काय फायदे आहेत. ते जाणून घेऊया.

१) मेडिटेशन करताना तुम्ही श्वासावर लक्ष दिल्यामुळे व तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा वेध घेल्यामुळे तुम्हाला वर्तमानकाळामध्ये जगणे सोपे जाते. भविष्याची चिंता न करता तुम्ही तो क्षण आनंदाने जगू लागता.

२) ध्यानामुळे तुम्हाला भूतकाळाच्या चिंता व भय सतावत नाहीत. ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार हे मुळातच आगळेवेगळे असल्यामुळे काही जणांना या ध्यानाच्या प्रकारांचा सराव करणे कठीण जाते.

३) मात्र माईंडफुलनेस मेडीटेशन या प्रकारामध्ये विशिष्ट ध्येय गाठणे फार कठीण नाही. विचाररहित अवस्था प्राप्त करुन घेण्यासाठी अतिशय कष्ट घ्यावे लागत नाहीत. या ध्यानासाठी तुम्ही केवळ त्या क्षणाबाबत जागृत असणे गरजेचे असते व त्या वर्तमान क्षणात येणा-या प्रत्येक विचारांवर लक्ष देण्याची गरज असते.

४) जीवन आनंदी व अर्थपूर्ण करण्यासाठी नियमित या मेडीटेशनचा सराव करा.

५) मेडीटेशनच्या नियमित सरावाने तुम्ही स्थिर होता व तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी त्यांच्या गरजांनूसार मोकळा संवाद साधणे सोपे जाते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी मेडिटेशन गरजेचे आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु