त्वचा आणि केसांच्या फायद्यासाठी करा ‘हलासन’, इतरही आहेत खास फायदे

त्वचा आणि केसांच्या फायद्यासाठी करा ‘हलासन’, इतरही आहेत खास फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हलासन केल्याने रक्ताभिसरण शरीरातील प्रत्येक भागात विशेषतः डोक्यामध्ये व्यवस्थित होते. केसांच्या मुळाशी पोषकतत्व पोहोचल्यामुळे केस काळे आणि घनदाट होतात. हे आसन करताना शरीराचा आकार हल म्हणजेच नांगरासारखा होत असल्याने यास हलासन म्हणतात.

असे करा आसन
प्रथम जमिनीवर अंथरलेल्या आसनावर पाठीवर झोपावे. दोन्ही हात शरीराला चिटकून ठेवावेत. दोन्ही पाय हळूहळू वर घेऊन जावे. आकाशाकडे पूर्ण उचलून नंतर डोक्यामागे झुकवा. पाय अगदी ताठ ठेवून पंजे जमिनीस लावावेत. हनुवटी छातीस चिटकवून ठेवावी. ३ ते ५ वेळेस ही क्रिया करा.

हे आहेत फायदे
१) पोट आणि कंबरेची चरबी कमी होते.
२) अकाली होणारी केसगळती कमी होते.
३) त्वचा निरोगी आणि उजळ होते.
४) थायरॉइडच्या आजारा पासून फायदा होतो.
५) मेटाबॉलिज्म जलद होते. डायबिटीजमध्ये लाभदायक आहे.

* स्पॉन्डेलायसिस, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, चक्कर, हृदयरोग हा त्रास असणारांनी तसेच गरोदरपणात, पीरियड्समध्ये हे आसन करू नये.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु