सुंदर दिसण्यासाठी पायाच्या तळव्यांची अशी घ्या काळजी, जाणून घ्या

सुंदर दिसण्यासाठी पायाच्या तळव्यांची अशी घ्या काळजी, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  धावपळीच्या आयुष्यामुळे महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केवळ चेहऱ्याची काळजी घेणे म्हणजे सौंदर्य नाही. यासाठी हातापायांचे सौंदर्यही तितकेच महत्वाचे आहे. पायांकडे तर नेहमीच दुर्लक्ष केले जाते. पायांना भेगा पडणे, खाज येणे, अशा समस्या यामुळे होतात. पायाच्या तळव्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत जाणून घेवूयात.

हे लक्षात ठेवा
१ पायात सतत चप्पल घाला.

२ पायाचे तळवे स्वच्छ करून त्याची मालिश करा.

३ तळवे स्वच्छ केल्याने त्याची निगा राखल्याने रक्तप्रवाह वाढून ऑक्सिजनचाही पुरवठाही चांगल्या प्रकारे होतो.

४ अंघोळीच्या वेळी तरी तळवे ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करा.

५ अंघोळ झाल्यानंतर तळव्यांना खोबरेल तेलाने मालिश करा.

हे उपाय करा
स्क्रबिंग
भेगा पडलेल्या तळाव्यांना स्क्रबिंग करा. यामुळे तळव्यांची डेडस्कीन जाईल. तळवे मुलायम होतील. स्क्रब करण्यापूर्वी पाय थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावेत.

खोबरेल तेल
भेगा आणि रुक्ष तळव्यांना खोबरेल तेल लावा. यामुळे मुलायमपणा कायम राहतो. जंतूंच्या संक्रमणापासूनही तळवे सुरक्षित राहतात.

ग्लिसरीन
भेगा पडल्या असतील तर तळव्यांसाठी ग्लिसरीन वापरा. रात्री झोपताना ग्लिसरीन लावा. लिंबू लावल्याने सुद्धा डेडस्कीन जाऊन त्वचा मुलायम होते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु