केसांच्या समस्या दूर करण्यासाठी लावा भृंगराज तेल, होतील ‘हे’ फायदे

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी लावा भृंगराज तेल, होतील ‘हे’ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन – भृंगराज तेल बाजारात विविध ब्रँडच्या नावाने उपलब्ध असते. हे तेल घरीही तयार करता येते. यासाठी भृंगराजची पाने अथवा पावडर लागते. भृंगराज एक आयुर्वेदिक औषध असून ते एल्बा या नावानेही ओळखले जाते. आयुर्वेदात याचा उपयोग केला जातो. हे केसांसाठी खूप गुणकारी असून यामुळे केसांचे गळती थांबते. केस दाट होतात. त्वचेसाठी सुद्धा भृंगराज तेल वापरले जाते. हे तेल एक्जिमा रोगासाठी अधिक फायदेशीर आहे.

हे आहेत उपयोग

१ पातळ केस दाट करण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो.

२ केस तुटणे ही समस्या दूर होते. केस मजबूत होतात.

३ या तेलाच्या मसाजने जलद गतीने केस वाढतात. केसांना पुर्ण पोषण देते.

४ या तेलाचा प्रभाव लवकर दिसून येतो. रात्रभर लावून ठेवण्याची आवश्यकता नसते. हे केवळ काही तासांसाठी लावावे.

५ हे डोक्याला थंड ठेवण्याचे काम करते आणि केसांची खाज दूर करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु