हे’ 1 आसन केल्यास दूर होतील अनेक आजार, जाणून घ्या

 
हे’ 1 आसन केल्यास दूर होतील अनेक आजार, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेले लोक औषधोपचारावर हजारो रूपये खर्च करत असतात. परंतु, आजारांपासून त्यांची लवकर सुटका होत नाही. मुळात आजार होऊच नये, यासाठी नेहमी शरीराची काळजी घेतली पाहिजे. तसेच सकस आहार आणि योग्य व्यायाम निवडला पाहिजे. यासाठी योग निद्रा केल्यास मनाला शांती मिळते, तसेच आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतात.

अशी करा योग निद्रा

जमीनीवर पाठीवर झोपा. दोन्ही पायांमध्ये किमान एका फुटाचे अंतर ठेवा. हात कमरेपासून सुमारे सहा इंच लांब ठेवा. डोळे बंद करुन शरीराला आराम द्या. ही क्रिया ३० मिनिटे करा.

हे आहेत ७ फायदे

१) अस्थमाच्या आजारात योग निद्रा लाभदायक आहे.
२) एकाच ठिकाणी तासनतास बसल्याने मानदुखी, सर्वायकलची समस्या होते. यासाठी योग निद्रा लाभदायक आहे.
३) योग निद्रा केल्याने महिलांची कंबरदुखीची समस्या दूर होऊ शकते.
४) योग निद्रामुळे शरीर शांत होऊन रक्तदाब नियंत्रणात राहतो.
५) मधुमेह असणारांना योग निद्रा खूपच फायदेशीर ठरु शकते.
६) हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी योग निद्रा खूप चांगला उपाय आहे.
७) योग निद्रा केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु