मौन बाळगण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

मौन बाळगण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दररोज काही वेळ मौन ठेवणे आणि ध्यान करणे ही एक चांगली आध्यात्मिक साधना आहे. मौन धारण केल्यानंतर जे विचार निर्माण होतात, त्या विचारात लहानात लहान इच्छादेखील पूर्ण करण्याचे सामर्थ्य असते. प्रत्येक दिवशी ६० हजार विचार निर्माण होतात. त्यातील ९० ते ९८ टक्के विचार दैनंदिनच असतात. अशाप्रकारे प्रत्येक विचार मेंदूत केमिकल रिलिज करतात, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात.

माणसाच्या मेंदूत १०० अरब न्युरॉन असतात. प्रत्येक न्युरॉनचे १००० संपर्क शरीरात असतात. प्रत्येक संपर्क प्रतिसेकंदाला २०० वेळा परिणाम दाखवितात. त्यामुळे २० हजार करोड खरब कॅल्क्युलेशन प्रतिसेकंद सुरू राहतात. हे सर्व प्रकार जीवन ऊर्जेतून चालतात. त्यामुळे विचारांना कमी करायला शिकलो तर जीवनासाठी ते खूप उत्तम असू शकते. काही मिनिटांसाठी मौन ठेवले तर शरीरातील ऊर्जेमध्ये वाढ होण्यास मदत होऊ शकते.

विचारांचे प्रमाण कमी केल्यास विचारांची गुणवत्ता सुधारता येते. विचारांना थांबवायला शिकल्यानंतर कोणताही विचार आपल्यासोबत जास्त वेळ ठेवू शकतो. त्यामुळे तो विचार ताकदवान होईल; प्रत्येक विचार एक रचनात्मक शक्ती असते. याचाच अर्थ जीवन आपल्याला चालवत नाही, तर आपण आपल्या पद्धतीने जीवनाला फिरवू शकतो. काही वेळ मौन धारण केल्यामुळे आपण आपल्या पद्धतीनुसार वातावरण निर्माण करू शकतो. मौनात जास्त फ्रिक्वेन्सी असलेले तरंग असल्यामुळे मौनातून काही विचार बाहेर पडले तर त्यातून चांगले परिणाम साधता येतात. त्यामुळे मौनातून काहीही साध्य करता येऊ शकते.

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

‘या’ पाच ‘फळा’चे सेवन केल्यानंतर ‘निद्रानाश’ होईल दूर

‘हे’ आहेत सॅलडचे ९ प्रकार, ‘कमजोरी’ दूर होऊन तब्येत होईल ठणठणीत

पालकाच्या भाजीचा रसही आहे ‘आरोग्यवर्धक’

डोळ्यातून सतत येणाऱ्या पाण्यासाठी करा ‘हे’ उपाय

‘दुधा’चा असा उपयोग केल्यास होतील ‘फायदे’च फायदे

८ आठवड्यांत घटवा वाढलेले ‘वजन’, ‘या’ आहेत विशेष टिप्स

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु