पॉवर, हॉट, अष्टांग योग माहित आहे का? जाणून घ्या ‘मॉडर्न योग’बाबत

पॉवर, हॉट, अष्टांग योग माहित आहे का? जाणून घ्या ‘मॉडर्न योग’बाबत

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पॉवर योग, हॉट योग आणि अष्टांग योग हा मॉडर्न योगाचा भाग आहे. तिरुमलई कृष्णमाचार्य यांनी मॉडर्न योगा सुरू केला. त्यांचा जन्म म्हैसूर येथे झाला. मॉडर्न आणि हठ योगची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांचे शिष्य बीकेएस आयंगर यांनी ही परंपरा पुढे नेली.

पॉवर योग
हे योगाचे अ‍ॅथलेटिकचे रूप असून या योगामध्ये सूर्यनमस्काराच्या १२ स्टेप्स आणि इतर आसनांचा समावेश आहे. यात श्वासांच्या गतीपेक्षा जास्त शरीराच्या लवचिकतेवर लक्ष दिले जाते. हा योग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. याच्या नियमित सरावाने शरीराची चरबी कमी होऊन शरीर सुडौल होते. शरीरातील ऊर्जा वाढते. याची सुरुवात एक तासापासून करावी. हळू-हळू क्षमतेनुसार वेळ वाढवावी. ब्लडप्रेशर आणि हृदय रोगाने ग्रस्त व्यक्तीने हा योग करू नये.

हॉट योग
यात योगासने ४५-४८ डिग्रीमध्ये केली जातात. जास्त घाम निघतो. हा योग करण्यापूर्वी आणि नंतर पाणी अवश्य प्यावे. सुरुवातीला ४५ मिनिट करावे. हा योग एक तासापेक्षा जास्त करू नये. जास्त घाम निघाल्यामुळे कमजोरी जाणवू शकते. रक्तप्रवाह सुरळीत राहतो. घाम जास्त आल्यामुळे शरीरातील विषारी तत्त्व लवकर बाहेर पडतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढते. वजन जलद गतीने कमी होते. हृदय विकार आणि बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी हा योग करू नये.

अष्टांग योग
यात योगाचे आठ अंग असून आसन, प्राणायाम आणि ध्यान मुद्रा खास आहेत. यामध्ये पोटाव्यतिरिक्त हनुवटी, छाती, दोन्ही हात, गुढगे आणि पाय जमिनीला स्पृहा करतात. यामुळे शरीराला विविध फायदे होतात. सुरुवातीला हे ३० मिनिट करावे. हळू-हळू क्षमतेनुसार वेळ वाढवू शकता. हा कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतो. अष्टांग योग उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि रक्ताच्या कर्करोगाचा धोका कमी करतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु