वार्धक्याच्या खुणा झाकण्यापेक्षा वार्धक्यालाच ठेवा दूर, जाणून घ्या

वार्धक्याच्या खुणा झाकण्यापेक्षा वार्धक्यालाच ठेवा दूर, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तारूण्यात आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास वार्धक्याच्या खुणा शरीरावर लवकर दिसू लागतात. तसेच हवा, पाणी आणि अन्नातील दुषित घटक सुद्धा आरोग्य तसेच त्वचेवर वाईट परिणाम करत असतात. वार्धक्याच्या अशा खुणा दिसू लागल्या की त्या झाकण्याची धडपड सुरू होते. परंतु, अशा खुणा झाकण्यापेक्षा वार्धक्यच दूर ठेवण्याचे उपाय केल्यास तारूण्य दीर्घकाळ टिकू शकते.

हे लक्षात ठेवा

१) थोड्या पाण्यात लिंबू पिळून त्वचा स्वच्छ करा. यामुळे दुषित घटक त्वचेपासून मुक्त होतात आणि त्वचेला टवटवी येते.

२) शरीराला हेल्दी फॅट्स मिळतात की नाहीत याचीही काळजी घ्यावी. त्वचाही टेन्शनमुळे खराब होते. म्हातारी होते. त्यावर सुरकुत्या पडतात.

३) वार्धक्य लपवण्याचा हा आटोकाट प्रयत्न वयाच्या एका टप्प्यानंतर किंवा खूप उशिरा सुरू होतो. वार्धक्य अटळ असले तरी ते दूर निश्चितच ढकलता येते.

हे ६ उपाय करा

१) रोजच्या टेन्शन्समुळे मनावर विपरित परिणाम होतो. तसेच त्वचाही टेन्शनमुळे खराब होते. सुरकुत्या येतात. त्यामुळे टेन्शनफ्री जगा. योगा, ध्यानधारणा करा.

२) त्वचा निरोगी राहाण्यासाठी योग्य आणि पुरेशी झोप घ्या. दुपारी झोपण्यापेक्षा शक्यतो रात्रीच पुरेशी झोप घ्यावी.

३) नियमित व्यायामामुळे मनाची, शरीराची आणि त्वचेची शक्ती वाढते.

४) दुषित पाणी, अन्न, आरोग्य आणि त्वचेवर परिणाम करतात. या दुषित घटकांपासून दूर रहावे.

५) शरीर स्वच्छ करताना दुषित घटक निघून जातील याकडे लक्ष द्या. रासायनिक घटक असलेल्या पदार्थांचा वापर शरीरावर करू नका.

६) हेल्दी फॅट्स घ्या. हे फॅट्स त्वचेची काळजी घेईल. मासे, ऑलिव्ह ऑइल, यासारखे पदार्थ सेवन करा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु