तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – त्वचा शुष्क होण्याचे विविध कारणे असतात. यामुळे त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. त्वचेत नैसर्गिक आद्रता असणे खूप आवश्यक आहे. अन्य उपाय करून त्वचेच आद्रता निर्माण करणे अशक्य आहे. त्वचा कोरडी होणे ही समस्या आरोग्याशी संबंधित कारणामुळे होते, असे तज्ज्ञ सांगतात.

तीव्र उन्हाच्या किरणांमुळेही त्वचा कोरडी होते. अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे त्वचेच्या दोन स्तरांचे नुकसान होते. डर्मिस स्तरावर कोलेजन आणि इलेस्टिन फायबर असतात. तीव्र उन्हामुळे याची हानी होते. परिणामी त्वचा सैल होऊन सुरकुत्या पडतात. उन्हात चेहरा झाकून बाहेर पडावे. सोबत सैल आणि मोकळे कपडे वापरावीत. उन्हात सनकोट, सनक्रीम, छत्रीचा वापर सुद्धा करू शकता.

हायपोथायरॉइडिज्म आजारात थायरॉइड ग्रंथी कमी प्रमाणात थायरॉइड हार्मोन्स स्रवीत करते. यामुळे तैल आणि घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथींची कार्यप्रणाली मंदावते. परिणामी त्वचेतील तजेलदारपणा कमी होतो. यासाठी आहारात विविध व्हिटामीनचा समावेश केला पाहिजे. तसेच नैसर्गिक आहारावर जास्त भर द्यावा. सप्लीमेंट देखील घेतली तरी चालते. तसेच साबणामुळेही त्वचेची हानी होते. साबणात वापरले जाणारे कीटाणूविरोधी घटक त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतात. म्हणून साबनाची निवड काळजीपूर्वक केली पाहिजे. ज्या साबणात सेरामाइडस असतील असा साबण निवडावा. सेरामाइड हा फॅटी मालीक्यूल असून त्यामुळे त्वचेत आद्रता निर्माण होते.

शेविंगमुळे त्वचेला आद्रता देणाऱ्या नैसर्गिक घटकांचे नुकसान होते. परिणामी त्वचा कोरडी होते असे त्वचातज्ज्ञांचे मत आहे. म्हणून अंघोळीपूर्वी शेविंग न करता अंघोळीनंतर शेविंग करावी. अंघोळीमुळे केस मऊ होतात आणि सहज कापले जातात. केसांची वाढ ज्या दिशेने होते. त्याच दिशेने शेविंग करावी. तसेच शेविंगनंतर चेहऱ्यावर क्रिम, जेल किंवा लोशन लावावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु