आयुर्वेदिक पध्दतीने दूर करा केसांच्या समस्या, ‘या’ उपायाने नाहीसा होईल कोंडा

आयुर्वेदिक पध्दतीने दूर करा केसांच्या समस्या, ‘या’ उपायाने नाहीसा होईल कोंडा

आरोग्यानामा ऑनलाईन टीम – वातावरण बदलाचा प्रभाव केसांवर पडत असतो. यामुळे कोंडा होणे, केस गळणे, कामुकुवत होणे अशा समस्या होतात. केसांशी संबधित काही खास व सोपे उपाय असून ते केल्यास केसांशी संबंधित सर्व समस्या मुळापासून नष्ट होऊ शकतात. हे उपाय कोणते आणि ते कसे करावेत याविषयी सविस्तर माहिती घेवूयात.

हे उपाय करा

* इंद्रावणी नामक झाडाचे मूळ गोमुत्रामध्ये मिसळून डोक्याला लावल्यास टक्कल पडण्याची समस्या दूर होते. मूळ मजबूत होते.

* केसांवर नारळातील ताजे पाणी लावून हलक्या हाताने मालिश केल्यास केस मुलायम होतात तसेच केस गळतीची समस्या दूर होते. ताज्या नारळातील मलईने केसांची मालिश केली जाते.

* आवळ्याचे चूर्ण घेऊन त्यामध्ये एक टोमॅटो मिसळून हे मिश्रण केसांना लावून २० मिनिट मालिश केल्यास कोंडा नष्ट होतो.

* घनदाट आणि मजबूत केसांसाठी शंखपुष्पीचे ताजे रोप वाळवून चूर्ण तयार करून घ्या. हे चूर्ण नारळाच्या तेलामध्ये टाकून मंद अग्नीवर २०-२५ मिनिट गरम करून घ्या. थंड झाल्यानंतर गाळून हे तेल केसांना लावल्यास केस मजबूत आणि घनदाट होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु