‘नैसर्गिक सौंदर्य’ हवे असेल तर प्रत्येक महिलेने लक्षात ठेवाव्यात ‘या’ ६ टिप्स ; जाणून घ्या

‘नैसर्गिक सौंदर्य’ हवे असेल तर प्रत्येक महिलेने लक्षात ठेवाव्यात ‘या’ ६ टिप्स ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सुंदर दिसण्यासाठी कपडे, मेकअप, विविध स्टाईल, यांचा आधार महिला नेहमीच घेतात. यामुळे त्या सुंदर दिसतात. अशा सौंदर्याकडे लक्ष दिले पाहिजेच, पण हे सौंदर्य काही काळापुरतेच मर्यादित असते. यासाठी तुमचे सौंदर्य आतूनसुद्धा असले पाहिजे. हे खरे, नैसर्गिक आणि दिर्घकाळ टिकणारे सौंदर्य असते.

१ योग-व्यायाम
योग, व्यायाम हे शरीर आणि आत्मा दोघांनाही सुंदर बनवते. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. यामुळे चेहरा तेजस्वी होतो. व्यायामामुळे शरीरातील रक्तसंचार सुव्यस्थित होतो. विकृतीही दूर होते.

२ फळे आणि भाज्या
तेल, मसालेदार पदार्थांऐवजी सात्विक आहार घ्यावा. भरपूर फळे आणि हिरव्या भाज्या खाव्यात.यात पोषणतत्त्व भरपूर असतात. सर्व फळांचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता दुर होते आणि शरीर निरोगी राहते. यामुळे चेहरा नैसर्गिक चमक दर्शवतो.

३ सकारात्मक दृष्टीकोण
सकारात्मकतेचा व्यक्तीमत्त्वावर सुद्धा परिणाम होत असतो. यामुळे तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

४ आत्मविश्वास
खरी चमक ही आत्मविश्वासाने वाढत असते. आत्मविश्वास चेहरा जास्त आकर्षक दिसतो. हेच आकर्षण तुम्हाला सर्वात सुंदर बनवते. आत्मविश्वासामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता.

५ प्रसन्न मन
चेहरा हा मनाचा आरसा आहे. आनंद याच ठिकाणी दिसून येतो. हसमुख चेहरा नेहमी लक्षात राहतो. प्रत्येक व्यक्ती त्याकडे आपोआप आकर्षित होतो. प्रसन्न मनाचा प्रभाव चेहरा आणि तुमचे मन या दोन्हींवर पडतो.

६ मेडिटेशन
मेडिटेशन मनाला एकाग्र करण्यासोबतच मनाला शांत करते, ज्याचा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. मेडिटेशन स्वभावाला सुंदर बनवते. ही आंतरिक सुंदरता नेहमीसाठी तुमच्या सोबत राहते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु