गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सर्वांनाच गोरी त्वचा हवी असते, आणि तिचे आकर्षणही असते. त्यामुळे चेहरा उजळण्यासाठी महिला तसेच पुरूषसुद्धा काहीना काही उपाय करत असतात. बाजारात उपलब्ध असलेल्या काही क्रिम्स खुपच महागड्या असून त्या वापरूनही फरक दिसून येत नसल्याने अनेकांची निराशा होते. अशावेळी घरगुती उपाय केल्यास खुप चांगला परिणाम दिसून येतो.

त्वचा गोरी होण्यासाठी काही महत्वाचे घरगुती उपायांची माहिती आपण घेणार आहोत. यापैकी उपाय म्हजणे  पीठ, हळद, सरसोचे तेल पाण्यात मिसळून उटणे तयार करावे. या उटण्याने रोज शरिराला मालिश करून गरम पाण्याने अंघोळ करावी. तसेच दुधात केशर टाकून प्यावे. दुसरा उपाय म्हणजे चार चमचे मुल्तानी माती, दोन चमचे मध, दोन चमचे दही, एक लिंबू हे सर्व एकत्र करून त्वचेला लावावे.अर्ध्या तासाने चेहरा धुवून टाकावा.

तिसरा उपाय खुप परिणामकारक असून कच्च्या दुधाचा वापर करून तो करता येऊ शकतो. यासाठी सकाळी कच्च्या दुधाने चेहऱ्याची मालीश करावी. चेहरा थोडा वाळल्यानंतर खाण्याच्या मिठाने त्वचेवर घासल्याने चेहऱ्यावर जमा झालेली धुळ आणि मृत झालेली त्वचा निघू जाते. चौथा उपाय करण्यासाठी डाळीचे पीठ, हळद, लिंबू, दही, गुलाब हे सर्व एकत्र करून त्याचा लेप अठवड्यातून एकदा लावावा. या उपायामुळे चेहरा उजळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु