उद्यापासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या “आसनांपासून” करा सुरुवात

उद्यापासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या “आसनांपासून” करा सुरुवात

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – उद्या २१ जून जागतिक योग्य दिवस हा जगातील अनेक देशात साजरा केला जातो. त्यामुळे भारतातही अनेक ठिकाणी योगदिवस साजरा केला जाईल. कोणताही महत्वाचा दिवस असेल तर अनेकजण काही तरी नवीन संकल्प करत असतात. त्यामुळे उद्या योगदिनानिमित्त अनेक जण उद्यापासून नियमित योग करण्याचा संकल्प करनार असतील. किंवा कोणी केलाही असेल. तुम्ही पहिल्यांदा योगा केला तर तुमचे अंग दुखेल त्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी योगा करणार नाहीत. असे व्हायला नको. म्हणून उद्या योगाची सुरुवात करताना या आसनापासून करा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.

१) बालासन : तुम्ही योगाची सुरुवात बालासनापासून करा. जेव्हा तुम्ही बालासन योगासन करणार असाल तेव्हा अगोदर जमिनीवर चटई अंथरा आणि त्यावर बसा. नंतर तुम्ही दोन्ही पाय दुमडून टाचांवर बसा. आणि टाचांवर तुमच्या शरीराचा संपूर्ण भार द्या. त्यांनतर आपले हात जमिनीवर ठेवा. पुढच्या बाजूला थोडेसे झुका जमिनीवर कपाळ टेकवा. जेव्हा तुम्ही खालच्या बाजूला कपाळ टेकवाल. तेव्हा काही वेळासाठी तसेच थांबा. नंतर हळू-हळू उठा.

उद्यापासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या “आसनांपासून” करा सुरुवात

२) वृक्षासन : हे आसन केल्याने महिलांना वजन नियंत्रणात ठेवण्यास फायदा होतो. त्यामुळे महिलांसाठी हे आसन महत्वाचं आहे. हे आसन करण्यासाठी सरळ उभे रहा. दोन्ही पायांच्या मध्ये एक फूटाचं अतंर ठेवा. आता उजवा पाय दुमडून तो डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवा. नंतर डावा पाय सरळ ठेवून शरीराचं संतुलन राखा. शरीराच योग्य संतुलन झाल्यानंतर दीर्घ श्वास घ्या. आणि हात डोक्यावर घेऊन जा. व नमस्कारची मुद्रा करा. यावेळी तुमच्या मणक्याचं हाड सरळ आहे का याची खात्री करा आणि मोठा श्वास घ्या. नंतर हळूहळू श्वास सोडा.आता हात खाली घ्या. आणि उजवा पायही सरळ करा.

उद्यापासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या “आसनांपासून” करा सुरुवात

३) नौकासन : चटईवर पाठीच्या आधारवर झोपा. आता हातांना शरीराला चिकटवून ताठ ठेवा. नंतर मोठा श्वास घ्या. श्वास सोडताना हातांना पायांच्या दिशेने स्ट्रेच करा. व पाय. छातीवरच्या बाजूला उचलून धरा. यावेळी हात आणि पाय वरच्या बाजूला असावेत. तसेच डोळे हातांच्या बोटांवर असावेत. नंतर दीर्घ श्वास घेत असताना आसनाच्या मुद्रेत कायम राहा. श्वास सोडताना हळूहळू जमिनीवर परत या.

उद्यापासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या “आसनांपासून” करा सुरुवात

४) ताडासन : हे आसन करण्यासाठी आधी उभं राहा. पाय आणि मांड्या वेगवेगळ्या ठेवा. श्वास घेत टाचा वर करा आणि आपले मांड्या जेवढ्या वरच्या दिशेने स्ट्रेच करता येतील तेवढया करा. आता श्वास घेत असतानाच आपलं पोट आणि छाती ही स्ट्रेच करा. नंतर श्वास सोडताना आपले खांदे डोक्यापासून लांब न्या.मान लांब करा. शरीराचं योग्य संतुलन करण्यासाठी हे आसन भिंतीचा आधार घेऊन करता येते. यामुळे शारीरिक संतुलन चांगले राहते. हे आसन महिलांसाठी अतीशय फायद्याचे आहे.

उद्यापासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या “आसनांपासून” करा सुरुवात

५) वृक्षासन : हे आसन करत असताना दोन्ही पाय जवळ घेऊन पोटावर झोपा. हात चटईवर खांद्यांच्या खालच्या बाजूला ठेवा. नंतर श्वास घेत असताना हळूहळू आपलं डोकं वरच्या बाजूला उचला. मग श्वास घेत असताना व आणि आपल्या हातांवर दाब द्या. परंतु कंबरेवर जास्त भार देऊ नका. काही वेळ याच अवस्थेत राहा.

उद्यापासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या “आसनांपासून” करा सुरुवात

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु