थंड हवेत केसांची अशी घ्या काळजी, जाणून घ्या ५ खास आणि सोप्या टिप्स

थंड हवेत केसांची अशी घ्या काळजी, जाणून घ्या ५ खास आणि सोप्या टिप्स

आरोग्यानामा ऑनलाईन टीम – हवेत वाढलेल्या गारव्याचा त्वचा, केस, यासह शरीराच्या विविध भागांवर परिणाम होत असतो. अशा वातावरणात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. थंड वातावरणात केसांची काळजी कशी घ्यावी याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

अशी घ्या काळजी

हेअर ड्रायरने केस वाळवल्यानंतरच वेणी किंवा बुचडा घाला. ओल्या केसांना बांधून ठेवले तर त्यामध्ये उवा होऊ शकतात. अशा वातावरणात केस कोरडे पडतात. त्यामुळे जेव्हा केस धुतले तेव्हा कंडिशनर वापरा. यामुळे केस चमकदार होतील.

त्वचा कोरडी होत असल्याने डोक्यात कोंडा होतो. यासाठी गरम तेलामध्ये लिंबाचा एक चमचा रस मिसळून लावा. रात्री हे मिश्रण लावा आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुवून घ्या.

या दिवसांत केसात गुंता जास्त होतो. हे टाळण्यासाठी विंटेड कंगवा वापरा. प्लास्टिक आणि प्राण्याच्या केसांपासून हा बनवला जातो.

या काळात केसांची चमक फिकी पडते. यासाठी केसांच्या मुळांना मध लावून नंतर केसांना एक तास टॉवेलने बांधून ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या. केस पुन्हा चमकतील.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु