लिफ्टपासून ते बाथरूमपर्यंत करू शकता मेडिटेशन, कसे ते जाणून घ्या

लिफ्टपासून ते बाथरूमपर्यंत करू शकता मेडिटेशन, कसे ते जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शारीरिक , मानसिक ताण दूर करण्यासाठी अनेक जण मेडिटेशन करतात. मेडिटेशनमुळे शरीराला फायदा होतो. मेडिटेशनमुळे मनाला शांती मिळते. शरिरात एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. मन एकाग्र होण्यास मदत होते. खूप  राग येत असेल तर यावर सुद्धा सकारात्मक परिणाम दिसून येतो. मेडिटेशनमुळे आरोग्य चांगले राहते. शिवाय, सकारात्मक विचार निर्माण होतात. मेडिटेशनसाठी वेळ नाही असे काही जण म्हणतात, मात्र हे खरे नसते. काही लोकांना मेडिटेशनची योग्य पद्धत माहिती नसते. तसेच मेडिटेशन कुठे करावे हे माहित नसते. अशा विविध कारणांमुळे मेडिटेशन करणे टाळले जाते. मेडिटेशन हे सोप्या आणि सहज पद्धतीने करता येते. याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

मेडिटेशन कुठे आणि कसे करता येईल

* बाथरूममध्ये शॉवरखाली केलेल्या मेडिटेशनमुळे चांगला फायदा होतो, असे तज्ज्ञ सांगतात. अंगावर पडणारे पाणी आणि आजुबाजूच्या  जेल, शाम्पू आणि साबणामुळे शरीर सुवसित होत असते. अशा वेळी शॉवरखालील मेडिटेशनमुळे मनाला आनंद मिळतो.

* लिफ्ट रिकामी असताना लिफ्टच्या कोपऱ्यात उभे राहून ध्यान लावावे. कोपऱ्यात उभे राहुन मेडिटेशन केल्याने बाहेरून येणाऱ्या लोकांचा त्रास सुद्धा होणार नाही.

* बाथरूममध्ये आपण स्नान करताना एकटेच असल्याने येथे एकाग्र होवून चांगल्याप्रकारे मेडिटेशन करू शकतो. बाथरूममध्ये मेडिटशन करताना पाय जमीनीवर सरळ ठेवावे व डोळे बंद करावे.

* रस्त्यावर सिग्नलला उभे असता याचा फायदा घेता घेईल. सिग्नलला उभे असताना डोळे बंद न करता हे मेडिटेशन करावे.

* सकाळ, संध्याकाळ बागेत फिरण्यासाठी गेल्यानंतर तेथे बाकावर बसून ही क्रिया करता येईल. खुल्या वातावरणातील मेडिटेशन मनाला प्रसन्नता देते. मनावरील ताण दुर होतो.

* गर्दीपासून वाचण्यासाठी आपण सब-वेचा वापर करतो. सब-वे मध्ये कमी गर्दी असल्याने येथे देखील मेडिटेशन करू शकता. मनाला शांत करण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. येथे मेडिटेशन केल्याने वेळ वाचतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु