पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा ‘ही’ आसने

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा ‘ही’ आसने

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्याला आपल्या आरोग्यकडे लक्ष देण्यासाठी अजिबात वेळ नाही. आणि त्यातच आहाराच्या बदलत्या सवयीमुळे अनेकांच्या पोटाची चरबी वाढत आहे. त्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपायही करतात. परंतु, कोणत्याही गोष्टीत बदल हवा असेल तर ती गोष्ट नियमित करणे गरजेचे आहे. तुमच्या पोटावरची चरबी वाढली असेल आणि तुम्हाला जर ती कमी करायची असेल तर खालील आसने करा. त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खालील आसने करा

Image result for bhujangasana

१) भुजंगासन :

१) पोटावरची चरबी कमी करण्यासाठी भुजंगासाठी हे खूप फायद्याचे आहे. जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ ठेवा. पायाची बोटे आणि कपाळ जमिनीला स्पर्श करतील असे झोपा.

२) दोन्ही पाय जुळवून घ्यावेत, तुमची दोन्ही पाउले आणि टाचा एकमेकाला हळूवारपणे स्पर्श होतील याची खात्री करून घ्या..

३)हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याखाली घ्या. हाताची कोपरं शरीराला लागून व समांतर असावेत.

४)एक दिर्घ श्वास घेऊन हळूवारपणे डोके, छाती व पोट वर उचला, पण तुमची नाभी जमिनीवरच असू द्यात.

५) आता, हातांचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे टाचेकडे खेचा.

६) पाठीतील प्रत्येक मणका एकामागे एक कमानीत येईपर्यंत, सजग राहून श्वास घेत राहा. जास्तीतजास्त मागे ताणून तुमचे हात सरळ राहतील असा प्रयत्न करा. आता डोके मागे घेऊन हात जमिनीवर सरळ येतील असे पहा.

७) खांद्यांना आराम द्या. हाताची कोपरं थोडे वाकवले तरी चालतील. सरावाने तुम्हाला कोपरं सरळ ठेऊन आसनस्थिती सुधारता येईल.

८) तुमचे पाय अजूनही जुळलेले आहेत ना याची खात्री करा. चेहऱ्यावर स्मित कायम ठेवत श्वास घेत राहा.

९) आसनस्थितीत प्रमाणाबाहेर जास्त वेळ राहू नका व सहन होईल एवढाच ताण द्या. श्वास सोडत आपले पोट, छाती व डोके जमिनीवर टेकवा.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा ‘ही’ आसने

२) बालासन :

१) हे आसन करताना पाहिलं गुडघ्यांवर बसा.

२) दोन्ही हात वर उचला. आणि हळूहळू पुढे वाकवत हात जमिनीवर ठेवा.

३) असं करताना छाती थाईच्या वरती असावी.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा ‘ही’ आसने

३) धनुरासन :

१) हे आसन करताना अगोदर जमिनीवर उलटे झोपा.

२)आता हात आणि पाय वर उचला आणि हाताने पाय पकडा.

३) हे आसन केल्यावर पोटाची चरबी लवकर कमी होईल.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा ‘ही’ आसने

४) पवनमुक्तासन :

१) पाठीवर झोपा. दोन्ही पाय जवळ ठेवा, दोन्ही हात शरीराजवळ ठेवा.

२) एक श्वास घ्या व तो सोडता सोडता उजवा गुडघा छातीपाशी घ्या. दोन्ही हाताचे पंजे एकमेकांत गुंतवून गुडघा पोटावर दाबा.

३) पुन्हा एकदा एक श्वास घ्या व तो सोडता सोडता डोके आणि छाती जमिनीपासून वर उचला व तुमच्या हनुवटीचा उजव्या गुडघ्याला स्पर्श करा. याच स्थितीत काही दीर्घ श्वास घ्या.

४) प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर गुडघा दोन्ही हातांनी आणखी दाबा. छातीवरील दाब वाढवा. जसा श्वास सोडाल तशी पकड ढिली करा. श्वास सोडता सोडता शरीर जमिनीला टेकवा व आराम करा.

५) ह्याच पद्धतीने डाव्या पायाने आसन करा. ह्या आसनस्थितीत खाली व दोन्ही बाजूंना शरीराला ३-५ वेळा झोके द्या. व आराम करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु