थंडीमुळे ओठ पांढरे पडलेत, फाटलेत का? मग करा ‘हे’ ६ घरगुती उपाय

थंडीमुळे ओठ पांढरे पडलेत, फाटलेत का? मग करा ‘हे’ ६ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम :  हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे, पायांना भेगा पडणे, ओठ फुटणे व पांढरे पडणे, आदी समस्या होतात. यातील ओठांच्या समस्यांमुळे सौंदर्य तर पूर्णपणे बिघडून जाते. म्हणून थंडीत ओठांची विशेष काळजी घेतली पाहिजे. ओठ मुलायम ठेवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याची माहिती आपण घेणार आहोत.

हे आहेत उपाय
१ रात्री झोपण्यापुर्वी ओठाला साधारण तापमान असलेली दुधावरची साय लावा. १० मिनिटे तशीच ठेवून नंतर कोमट पाण्यात कापूस भिजवून हलक्या हाताने ओठ स्वच्छ करा.
२ ओठांना गुलाबपाणी लावा.
३ दिवसभर अधूनमधून ओठांना मध लावा.
४ मध आणि ग्लिसरीनचे मिश्रण करुन ते रात्री झोपण्याआधी ओठांना लावा.
५ दिवसभरातून जमेल तेव्हा ओठांना खोबरेल तेल लावा.
६ ओठांना आलिव्ह ऑईल किंवा कॅस्टर ऑईल लावा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु