केसांच्या प्रकारावरून निवडावे ‘तेल’, तरचं होईल ‘योग्य पोषण’

केसांच्या प्रकारावरून निवडावे ‘तेल’, तरचं होईल ‘योग्य पोषण’

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केसांच्या पोषणासाठी तेल निवडताना केसांचा प्रकार लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे. कारण केसांच्या प्रकारानुसार त्यांची विटामिन्स आणि खनिज तत्त्वांची गरज वेगवेगळी असते. म्हणून केसांच्या प्रकारानुसार कोणते तेल लावावे हे ठरवावे. तरच केसांना तेलाचा फायदा होतो. दाट केसांना डीप कंडिशनिंग करण्याची गरज असते. यासाठी ऑलिव्ह आइल जास्त फायदेशीर ठरते. या तेलात मोनोसॅच्युरेटेड फॅट असते याच्यामुळे केसांचा रूक्षपणा कमी होतो.

त्याचप्रमाणे अंटीऑक्सिडेंट्स आणि ओमेगा-३ फॅटी अँसिडमुळे केसांतील लवचीकपणा वाढतो. तसेच केस रूक्ष आणि गुंता झाल्यामुळे विंचरता येत नाहीत. अशा केसांना किंवा कुरळ्या केसांसाठी अवोकेडो ऑइल उपयुक्त ठरते. अवोकेडो तेलात प्रोटीन आणि अमिनो अँसिड भरपूर असते. केसांचे बाहेरील आवरणावर असणारी छिद्रे भरण्यासाठी याची मदत होते. यात विटामिन ए, डी, आणि ई मुबलक प्रमाणात असते. हे तेल सर्वत्र उपलब्ध असते.

सरळ आणि लांब केस असणारांनी आलमंड ऑइल लावावे. हा विटामिन ए, बी, सी आणि ईचा चांगला स्रोत आहे. हे विटामिन दुतोंडी केसांची समस्या कमी करून कोरडेपणा कमी करते. या तेलामुळे केसांची चमक वाढते. यातील फॅटी अँसिड अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून केसाचे रक्षण करतात. विरळ केस असणारांनी रोजमेरीचे तेल लावावे. यामुळे हेअर फोलिकल्समध्ये वाढ होते. केस दाट होण्यासाठी हेअर फोलिकल्स महत्त्वाचे असते. या तेलात लोह, कॅल्शियम आणि विटामिन बी सारखी पोषक तत्त्वे असतात. हे तेल अँटी एंजिग एजंट म्हणून काम करते. या तेलाने केसांचा रंग आकर्षक होतो. तसेच केसात चमक येऊन ते गळण्याचे प्रमाणही कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु