‘या’ ५ देशांच्या महिला का दिसतात अधिक सुंदर ? हे आहे त्यांच्या सौंदर्याचे गुपित !

‘या’ ५ देशांच्या महिला का दिसतात अधिक सुंदर ? हे आहे त्यांच्या सौंदर्याचे गुपित !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – इराण, रशिया, पाकिस्तान, इटली आणि काश्मिर (भारत) येथील महिलांचे भूरळ पाडणारे सौंदर्य जगभरात प्रसिध्द आहे. येथील महिलांना त्यांच्या आकर्षक सौंदर्यासाठी ओळखले जाते. त्यांच्या देशात उपलब्ध असलेल्या काही खास हेल्दी फूडचा वापर करून त्या आपले सौंदर्य वाढवतात. तसेच त्वचा आणि केसांची काळजी घेतात. या महिला सौंदर्य वाढविण्यासाठी कोणते उपाय करतात, याची माहिती आपण घेणार आहोत.

ईराण
येथील महिला चेहऱ्याला गुलाबजल लावतात. यामुळे त्वचा मुलायम आणि तजेलदार होते. तसेच गुलाजलमध्ये अक्रोडही टाकले जाते, यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात.

रशिया
येथील महिला दही आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावतात. तसेच कॅमोमाईल टी पितात. यामुळे फेयरनेस वाढतो. वजन नियंत्रणात राहते.

पाकिस्तान
येथील महिला बेसनमध्ये हळद व दही मिक्स करून चेहऱ्यावर लावतात. रोज ग्रीन टी, ब्लॅक टी पितात. यामुळे त्वचा तजेलदार होते. केस काळेभोर आणि दाट होतात.

इटली
येथील महिला वर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये जेवण तयार करतात. यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. तसेच जेवणात लेमन, व्हिनेगरसारख्या पदार्थांचा वापर करतात.

काश्मिर (भारत)
येथील महिला सफरचंदसारखे विविध गुणधर्म असलेले फळ खातात. यामुळे बांधा सुडौल राहतो. तसेच या महिला दुधामध्ये केशर आणि चंदन पावडर मिसळून चेहऱ्यावर लावतात. यामुळे रंग उजळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु