अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्या शरीराला घाम सुटणे नैसर्गिक आहे. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात ही समस्या जास्त जाणवते. या घामामुळे शरीराला दुर्गंधीचा ही त्रास होतो. अशाच घामाचा दुर्गंध टाळण्यासाठी आपण विविध बॉडी स्प्रेचाही वापर करतो. तर हे बॉडी स्प्रे निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे ते पाहुयात

अल्कोहल फ्री डिओ-
जर तुम्ही नियमित डियोचा वापर करत असाल तर तो डियो अल्कोहल फ्री आहे हे आधी खात्री करा. सुगंध आणि ब्रँड सोबतच या गोष्टीकडेही लक्ष दिला पाहिजे. जर डियो अल्कोहल फ्री नसेल तर त्याच्या नियमित वापरामुळे त्वचेवर इन्फेक्शन किंवा अ‍ॅलर्जी होण्याचा धोका असतो.

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

त्वचेनुसार निवडा डिओ –
प्रत्येकाची त्वचा सारखी नसते. म्हणून डियो निवडताना आपल्या त्वचेनुसार निवडा. कारण एखाद्या डियो मुळे आपल्याला इन्फेक्शनही होऊ शकतो. तर शक्यतो डिओमध्ये अ‍ॅल्युमिनियम कोलोहायड्रेट असेल असे डियो घ्या, कारण अ‍ॅल्युमिनियम कोलोहायड्रेटमुळे त्यात कुलिंग इफेक्टअसतो जो शरीराला स्किन अ‍ॅलर्जी पासून दूर ठेवतो.

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

रोल ऑन्स चा वापर करावा –
काही लोकांना सतत येणाऱ्या घामामुळे डिओचा प्रभाव त्यांच्यावर जास्त काळ टिकत नाही. तर अशा लोकांनी डिओ ऐवजी रोल ऑन्स चा वापर करावा जो अधिक काळ टिकू शकतो.

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

स्टिक असणारे डिओ वापरावे-
भरपूर लोकांना आणि त्यातल्या त्यात मुलींना नेहमी अंडरआर्म्स शेव्ह  करण्याची सवय असते. तर अशा लोकांनी शक्यतो स्टिक असणारे डिओ वापरावे याचा स्प्रे डिओ पेक्षा अधिक फायदा होतो.

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

उग्र वासाचे डिओ टाळा –
खूप लोकांना उग्र वासाचे डिओ फार आवडतात. या अशा उग्र वासाच्या डिओ मध्ये आर्टिफिशियल केमिकल्सचा वापर अधिक असल्याने यामुळे त्वचेला होण्याचा धोका निर्माण होतो.

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु