घरी ‘लेंन्स’ लावताना डोळ्यांची ‘अशी’ काळजी घ्या

घरी ‘लेंन्स’ लावताना डोळ्यांची ‘अशी’ काळजी घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजकाल डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी कलर्ड लेंन्सेसचा वापर सर्रास केला जातो. तसेच डोळ्यांना जर नंबर असेल तर चष्म्याऐवजी लेंन्सला पसंती दिली जाते. या कलर्ड लेंन्सने डोळ्यांचे सौंदर्य नक्कीच खुलून येते, परंतु या लेंन्स लावताना डोळ्यांची आणि लेंन्सचीही विशेष काळजी घ्यावी लागते. प्रखर ऊन , धूळ आणि मेकअपने देखील डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यासाठी लेंन्स लावताना आणि काढताना डोळ्यांची कशी काळजी घ्यायची हे पाहुयात.

१. डोळ्यांना इन्फेक्शन झाले असल्यास लेंन्सेसचा वापर टाळा –
निरोगी डोळ्यांवरच लेंन्स लावावेत . डोळ्यांना जर काही इन्फेक्शन झाले असेंन तर लेन्स लावू नका .

२. हात स्वच्छ करा –
लेंन्स लावण्यापूर्वी हात नेहमी साबणाने स्वच्छ धुवा . त्यानंतर हात व्यवस्थित कोरडे करून घ्या .
हात कोरडे करण्यासाठी तंतुमय कापडाचा वापर करू नका त्याने कापसाचे तंतू हातावर राहीलेच तर हे तंतू लेंन्सला चिटकून डोळ्याना इजा करू शकतात .

३. मेकअप पूर्वी लेंन्स लावा-
मेकअप केल्यानंतर लेंन्स लावले तर मेकअपचे केमिकल्स डोळ्यात जाऊ शकतात . त्यामुळे लेंन्स आधी सेट करून मग मेकअपला सुरुवात करावी.

४. मेकअप काढण्यापूर्वी लेंन्स काढा –
मेकअप काढण्यापूर्वी स्वच्छ हाताने लेंन्स काढून घ्या . त्यांना लेंन्स होल्डर मध्ये नवीन सोल्यूशनमध्ये बुडवून ठेवा . त्यानंतरच बाकी मेकअप काढा . त्यामुळे डोळ्यावरील मेकअप काढणे तर सोपे होईलच पण लेंन्स देखील स्वच्छ आणि सुरक्षित राहतील.

५. पेन्सिल लायनरचा उपयोग करा –
लेंन्स जेव्हा लावणार असाल तेव्हा मेकअप करताना पेन्सिल लायनरचा उपयोग करावा . डोळ्यात मेकअपचे केमिकल जाणार नाहीत याची नेहमी काळजी घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु