रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा…होतील हे चांगले परिणाम

रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा…होतील हे चांगले परिणाम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रात्रीच्या वेळी त्वचा जलद पुननिर्माण स्थितीत असते. या काळात हानी पोहोचलेल्या पेशींच्या जागी नव्या पेशी येतात आणि नव्या पेशी विकसित होत असतात. त्वचेसाठी ही प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. मात्र, रात्री चेहऱ्यावर मेकअप तसाच ठेवून झोपल्यास ही प्रक्रिया बाधित होऊन त्वचा निस्तेज आणि सुरकुत्या असल्यासारखी दिसू लागते. यासाठी त्वचारोगापासून रक्षण करण्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला पाहिजे.

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप काढणे खूप जरूरी आहे. कारण मेकअप न काढता झोपल्यास चेहऱ्यासाठी ते अपायकारक असते, असे तज्ज्ञ सांगतात. प्रत्येक व्यक्ती एका दिवसात आपल्या चेहऱ्याला ५५०० वेळा हात लावतो. अशाप्रकारे अजाणतेपणे अनेक बॅक्टेरिया किंवा धुलीकण चेहऱ्याला चिकटतात. झोपताना चेहरा साफ न केल्यास मेकअप, धुळीचे कण आणि त्वचेतून निघणाऱ्या तेलकट पदार्थामुळे त्वचेवरील रंध्रे बंद होतात. अशाने चेहऱ्यावर मुरूम किंवा काळ्या डागांची समस्या निर्माण होते.

रात्री चेहऱ्याच्या त्वचेतून तेलकट पदार्थ स्रवत असतो. अशा स्थितीत तेलकट पदार्थ मेकअपशी एकरूप झाल्याने याचे अनेक दुष्परिणाम त्वचेवर दिसून येतात. झोपताना चेहऱ्यावर फाउंडेशन, पावडर किंवा ब्लश लावलेले असल्यास त्वचेच्या नैसर्गिक तजेलपणाचे नुकसान होते. तसेच त्वचा निस्तेज होत सुरकुत्या पडण्याची प्रक्रिया सुरू होते. वयस्क होण्याचा धोका कमी करायचा असल्यास या चूका टाळल्या पाहिजेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु