सुरकूत्या दूर करण्यासाठी नारळपाण्याने धुवा चेहरा, होतील ५ फायदे

सुरकूत्या दूर करण्यासाठी नारळपाण्याने धुवा चेहरा, होतील ५ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – तारूण्य टिकवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. चेहरा तेजस्वी आणि नितळ दिसण्यासाठी विविध प्रकारची प्रॉडक्ट तरूण आणि तरूणी वापरत असतात. परंतु, अनेकदा या प्रॉडक्टचा काहीएक उपयोग होत नाही, अखेर त्यांची निराशाच होते. परंतु, काही छोटे-छोटे घरगुती उपाय केल्यास सौंदर्य निश्चितच वाढू शकते. यापैकीच एक नारळ पाण्याचा उपाय आहे. नारळ पाण्याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा

* डाग सुरकुत्या असतील तर नारळ पाण्याने चेहरा धुवा. डाग कमी होऊन त्वचेला नैसर्गिक चकाकी मिळेल.

* मुरुमे असल्यास नारळपाण्याने चेहरा धुवा. यामुळे अतिरिक्त तेल कमी होते. मुरूमांची समस्या कमी होते.

* डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास नारळपाणी काही दिवस डोळ्यांखाली आलेल्या काळ्या वर्तुळावर लावल्यास काळी वर्तुळे कमी होतात.

* चेहरा धुण्यासाठी नारळपाण्याचा वापर केल्यास त्वचा उजळते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु