‘या’ घरगुती टिप्स वापरा आणि चेहऱ्याचा तेलकटपणा आणि पिंपल्स घालवा

‘या’ घरगुती टिप्स वापरा आणि चेहऱ्याचा तेलकटपणा आणि पिंपल्स घालवा

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या त्वचेमध्ये तैलीय ग्रंथी जास्त असतात. काही लोकांच्या त्वचेला तेलकटपणा येतो. त्यामुळे सामान्य त्वचेपेक्षा तेलकट त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. अनेकांना या सततच्या तेलकटपणापासून सुटका पाहिजे असते. तसेच पिंपल्स ही समस्या पण खूप आहे. जी मोठ्या प्रमाणात टिनएजर्समध्ये दिसते. तरुणपणात काही हार्मोनल बदल होत असतात. यामुळे चेहर्‍यावरील तेलीय ग्रंथी जागृत होतात. आणि या ग्रंथींवर बॅक्टेरिया अटॅक करतात.

 त्वचेचा तेलकटपणा आणि पिंपल्स घालवण्यासाठी वापरा या टिप्स 

१) त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी नैसर्गिक गुण असलेल्या फेसवॉशचा वापर करा.

२) प्रत्येक आठवड्यातूल एकदा लाइट स्क्रबचा वापर करा. कारण चेहऱ्याचा मसाज केल्याने धूळ, माती, मेकअप निघून जातं. त्यामुळे त्वचेची छिद्रे साफ होतात.

‘या’ घरगुती टिप्स वापरा आणि चेहऱ्याचा तेलकटपणा आणि पिंपल्स घालवा

३) कडूलिंबाच्या पाने उकळून गाळून घ्या. हे पाणी चेहऱ्यावर लावा. याने चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होईल.

४) चंदन पावडर आणि पपईचा पॅक तयार करुन तो चेहऱ्यावर लावा.

५) जेव्हाही घराबाहेर पडाल चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर लावून निघा. यामुळे तुमच्या चेहऱ्याचं धुळीपासून संरक्षण होईल.

६) काकडीच्या रसात काही थेंब लिंबाचा रस टाकून ते 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु