तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर

तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : ब्रह्मांडाच्या प्रत्येक निर्मितीत विविधता आणि सौंदर्य असून ते पाहण्यासाठी असलेल्या अदभुत इंद्रियास डोळे असे म्हणतात. ईश्वराने जगाची निर्मिती अनेक रंगांच्या मिश्रणातून केली आहे. सूर्याची सप्तरंगी किरणे, समुद्रतळातील मोती, शिंपले, खळाळणा-या नद्या, बर्फाच्छादित हिमालय, प्रत्येक ठिकाणी नाविण्य असून ते आपण केवळ आपल्या डोळ्यांमुळे पाहू शकतो.

ज्ञानेंद्रिय डोळ्यामुळे सृष्टीची ही विविध रुपं आपण अनुभवतो. यावरून डोळ्यांचे महत्त्व ध्यानात येते. अशा डोळ्यांची काळजी घेऊन त्यांचे रक्षण करणे खूप गरजेचे आहे.अनेक कविता, गिते यामध्ये डोळ्यांवर रचना करण्यात आल्या आहेत. डोळ्यांची काळजी करण्याची परंपराही आपल्या देशात शेकडो वर्षांपासून आहे. सुरमा, काजळ हे यासाठीच प्राचीन काळापासून वापरले जात आहे. आयुर्वेदही यासाठी विविध उपचार आणि माहिती देण्यात आली आहे. १७९८ मध्ये अमेरिकेच्या इलिनियत विद्यापीठातील डॉ. ग्लीन डेविसन हे भारतात आले होते. त्यांनी भारतीय आयुर्वेदाचा सा-या जगाला परिचय करून दिला.

११ व्या शतकात कानानेली यांनी लिहिलेल्या रसायन विज्ञानाच्या पांडुलिपीत अनेकदा औषधीशाला या शब्दाचा वापर झाला आहे. रस्त्याच्या आणि शेतीच्या कडेने मिळणा-या पिवळा धोतरा या वनस्पतीचे तेल विषारी असते. या वनस्पतीसारखीच दिसणारी दुसरी एक वनस्पती असते. त्या वनस्पतीचा वापर डोळ्यांचे आजार दूर करण्यासाठी करतात.नीलगिरी, हिमालय, भूतान आदी भागात ममीरा नावाची वनस्पती आढळते. या वनस्पतीच्या मुळांना रसवंती म्हणतात. यापासून तयार केलेल्या काजळीमुळे डोळे तेजस्वी होतात. अशा अनेक वनस्पती सांगितल्या गेल्या आहेत. हजारो वर्षांपासून त्या वनस्पतींचा वापर होत आहे. बार्बेरिन नावाचे रसायन या वनस्पतींमध्ये असते. डोळ्यांसाठी हे ते खूपच गुणकारी आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु