उन्हाळ्यात चेहऱ्याला थंडावा देणारे ‘हे’ फेसपॅक ट्राय करा

उन्हाळ्यात चेहऱ्याला थंडावा देणारे ‘हे’ फेसपॅक ट्राय करा

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्याच्या दिवसांत सूर्याच्या तीव्र किरणांचा वाईट परिणाम त्वचेवर होत असतो. त्वचा तेलकट, चिपचिपीत होते. तीव्र ऊन, घाम, सोबत प्रदूषण, धूर, धूळ यामुळे त्वचेचं नुकसान होतं. त्वचेवर ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स येण्याचं प्रमाण वाढतं. सोबतच अ‍ॅक्नेचा त्रासही बळावतो. उन्हापासून बचाव करण्यासाठी महिलाअनेक प्रकारच्या प्रॉडक्टचा वापर करतात; पण या प्रॉडक्टमध्ये अनेक प्रकारची रसायनं असतात. सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. त्यामुळे काही घरगुती फेसपॅकची माहिती आम्ही येथे देत आहोत. ते जरूर ट्राय करून बघा.

काकडीपासून फेसपॅक तयार करण्यासाठी काकडीच्या सालींवर साखर लावा. १५ ते २० मिनिटे ते फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर ते संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि २० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्यात चेहरा धुवा. दही आणि कोरफडचं फेसपॅक तयार करताना ४ चमचे कोरफडचा गर आणि १ चमचा दही एकत्रित करून घ्या. हे मिश्रण २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्यात चेहरा धुवा. टोमॅटो आणि मधापासून फेसपॅक तयार करण्यासाठी टोमॅटोच्या रसामध्ये १ चमचा मध मिसळा आणि २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्या. आठवड्यातून दोन-तीनवेळा हे फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळ होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु