‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या

‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : उंच टाचांच्या चप्पल अनेक महिला घालतात. यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व खुलून दिसत असले तरी त्याचे काही दुष्परिणामही आहेत. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता उंच टाचांच्या चप्पल घालणे त्रासदायक ठरू शकते. उंच टाचांच्या चप्पल घातल्याने कोणत्या समस्या होतात, ते जाणून घेवूयात.

हे आहेत दुष्परिणाम
१ पायांवर ताण पडल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रक्तपुरवठा कमी होऊ शकतो.
२ टाचांना दुखापत होते. टाचांवर ताण येतो. कंबरेपासून टाचांपर्यंत दुखणे सतावू शकते.
३ कंबरेचे दुखणे सुरू होऊ शकते.
४ पायांच्या स्नायूंवर ताण आल्याने पाय दुखणे चालू होते. पायांच्या नसा दुखायला सुरुवात होते.
५ पायाची बोटे काही कालावधीनंतर दुखण्यास सुरूवात होते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु