‘या’ कारणामुळे तरूण वयात पुरुषांना होते केस गळतीची समस्या, करा ‘हे’ उपाय

‘या’ कारणामुळे तरूण वयात पुरुषांना होते केस गळतीची समस्या, करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्याकडे वीस ते तीस वयोगटातील पुरूषांना केस गळतीची समस्या जास्त भेडसावते. अलिकडे हे प्रमाण खुपच वाढत चालले आहे. अकाली केस गळतीच्या समस्येचे सर्वात प्रमुख कारणे म्हणजे मानसिक तणाव, धूम्रपान, मद्यपान, प्रदूषण, अनुवंशिकता आणि पौष्टिक आहाराची कमतरता हे आहे. काही वेळा विषारी पदार्थांमुळे होत असलेल्या आजारपणामुळेही केस गळतात.

हे उपाय ४ करा

१) योग आणि ध्यानधारणा करा. तणावापासून लांब राहा. तणावामुळे एपिनेफ्रीन आणि कोर्टिसोल हे हार्मोन्स केसांच्या प्राकृतिक विकासात बाधा घालतात.

२) ताजी फळे आणि भाजीपालाचे सेवन करा. ज्या पदार्थांमध्ये लोह, जस्त, प्रोटीन आणि ओमेगा ३ फॅटी एसिड भरपूर आहे असे पदार्थ सेवन करा. धुम्रपान आणि मद्यपान टाळा.

३) जीवनशैलीत योग्य ते बदल करा. किमान सात तास गाढ झोप घ्या. पूरेशा प्रमाणात पाणी प्या. प्रोटिनयुक्त आहार घ्या.

४) कोमट तेलाने डोक्याला मसाज करा. यामुळे ब्लड सर्कुलेशन चांगले राहते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु