‘हे’ ४ फेस पॅक पुरुषांना ठेवतील कायम चिरतरुण, घ्या जाणून 

‘हे’ ४ फेस पॅक पुरुषांना ठेवतील कायम चिरतरुण, घ्या जाणून 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सुंदर दिसायला सर्वांनाच आवडते. तसेच महिलांप्रमाणेच पुरूषही आपलं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे पुरुष बाजारात मिळणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांसोबतच सलूनमधील महागड्या ट्रिटमेंट्सही फॉलो करत असतात. पुरूषांना कामानिमित्त सतत बाहेर जावं लागत. बाहेरच्या धुळीमुळे त्यांची त्वचा काळी पडते. या त्वचेला जर त्यांना उजळायचं असेल तर ते काही घरगुती उपाय करून आपली त्वचेला उजळवून कायम चिरतरुण राहू शकतात.

१) मिल्क फेस पॅक –

मिल्क फेस पॅक तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये दूध घ्या आणि कापूस किंवा रेशमी कपड्याच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. साधारणतः १५ ते २० मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. काही दिवसांपर्यंत असं केल्याने तुम्हाला फरक जाणवेल. तसेच त्वचा उजळण्यासही मदत होईल. दूधाचा फेस पॅक नैसर्गिक असतो, जो त्वचेमध्ये आतपर्यंत जाऊन डेड स्कि रिकव्हर करण्यासाठी मदत करतो. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते. याव्यतिरिक्त बंद पोर्स ओपन करण्यासाठी दूधातील पोषक घटक मदत करतात.

‘हे’ ४ फेस पॅक पुरुषांना ठेवतील कायम चिरतरुण, घ्या जाणून 
२) बनाना फेस पॅक-

केळी वापरून तयार केलेला फेसपॅख पुरूषांच्या निस्तेज त्वचेवर ग्लो आणण्यासाठी मदत करतो. केळ्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेमध्ये खोलवर जाऊन त्वचेचं आरोग्य राखण्याचं काम करतात. यासाठी गुलाब पाण्यामध्ये केळ्याची पेस्ट एकत्र करून चेहऱ्यावर लावून थोडा वेळासाठी तसचं ठेवा. त्यानंर पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. अशाप्रकारे केळीपासून तयार केलेला फेस फॅक वापरल्याने डाग आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील घाण दूर होण्यास मदत होते.

‘हे’ ४ फेस पॅक पुरुषांना ठेवतील कायम चिरतरुण, घ्या जाणून 
३) पपईचा फेसपॅक-

पुरूषांच्या त्वचेसाठी पपईचा फेसफॅक फायदेशीर ठरतो. त्यासाठी पपईची पेस्ट तयार करून घ्या. यामुळे त्वचेचा उजाळा वाढवण्यासाठी मदत होते. पपई कापून त्याची पेस्ट तयार करून घ्या. आता त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा दूध व्यवस्थित एकत्र करा. तयार फेसपॅक दोन्ही हातांनी आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. दहा मिनिटांसाठी तसचं ठेवून पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या फेसपॅकमुळे चेहरा स्वच्छ होण्यासोबतच त्वचा उजळवण्यासाठीही मदत होते.

‘हे’ ४ फेस पॅक पुरुषांना ठेवतील कायम चिरतरुण, घ्या जाणून 
४) मुलतानी माती 

मुलतानी माती वापरून तयार करण्यात आलेला फेसपॅक पुरूषांच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. मुलतानी मातीतील गुणधर्म त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी मदत करतात. यासाठी गुलाब पाणी आणि मुलतानी माती एकत्र करून एक पेस्ट तयार करून घ्या. काही वेळानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. जर नियमितपणे हा उपाय फॉलो केला तर तुम्हाला त्वचेवर फरक जाणवेल. मुलतानी माती त्वचा मुलायम आणि चमकदार करण्यासाठी मदत करते.

‘हे’ ४ फेस पॅक पुरुषांना ठेवतील कायम चिरतरुण, घ्या जाणून 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु