तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – धावपळ आणि तणावग्रस्त जीवनात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत आहे. यामुळेच  फास्ट इफेक्टच्या नावाखाली पारंपारिक आयुर्वेदिक उपायांकडे दुर्लक्ष केले जात आहे. उपचारांसाठी अनेक घातक रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. निरोगी त्वचेसाठी सुद्धा अशीच उत्पादने वापरली जात असल्याने त्याचे दुष्परिणाम जास्त दिसून येतात. म्हणूनच त्वचा अधिक तजेलदार, उजळ करण्यासाठी कॉस्मेटिक्सचा वापर न करता काही घरगुती उपाय करणे, जास्त लाभदायक आहे.

हे उपाय करा

* चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी दोन चमचे टोमॅटो रस आणि अर्धा चमचा मध एकत्रित करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. २० मिनिटांनी चेहरा धवून घ्यावा. या उपायाने चेहरा उजळतो.

* बे सन, मध, ऑलिव्ह, दुधाची साय एकत्र करून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास तो प्रभावी टॉनिकप्रमाणे काम करतो. ३ चमचे बेसन पीठ, मध, दुधाची साय आणि ऑलिव्ह तेल १-१ चमचाभर मात्रेत घेऊन एकत्र करावे. हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे. नंतर चेहरा स्वच्छ धवून घ्यावा.

* चेहऱ्यावर दोन चमचे टोमॅटोचा रस आणि चार चमचे दह्याचे मिश्रण लावावे. हे मिश्रण वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. या उपायाने सौंदर्य खुलते.
* १ चमचा बदाम तेलामध्ये अर्धा चमचा दुधाची साय आणि लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. * रक्तचंदन नारळाच्या मलईमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावावे. हे मिश्रण त्वचेसाठी खूप लाभदायक आहे.

* चार चमचे मुलतानी माती, दोन चमचे दही, एका लिंबूचा रस हे सर्व एकत्र मिसळून त्वचेवर लावावे. हा लेप चेहऱ्यावर अर्धा तास ठेवून नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
* काकडीचा रस त्वचेचा काळा रंग दुर करतो. काकडीचा रस रोज १५ मिनीटे लावावा. चेहरा उजळू लागेल. * केळ त्वचेसाठी खूप लाभदायक असून पिकलेले केळ बारीक करून चेहऱ्यावर फेसपॅकप्रमाणे लावावे. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धवून घ्यावा. चेहरा धुतल्यानंतर रक्त चंदनाचा लेप लावावा. हा उपाय केल्यास त्वचा उजळते.

* मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्रित करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. २० मिनिटांनी चेहरा कापसाने स्वच्छ करून घ्यावा. या उपायाने त्वचा मुलायम होते.
* कोरफडीच्या पानांचा रस काढून त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून हे मिश्रण चेहऱ्यावर लावून वाळल्यानंतर धुवावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु