‘या’ ६ चुकांमूळे ओठ होऊ शकतात काळे, तुम्‍ही तर करत नाही ना ? जाणून घ्या

‘या’ ६ चुकांमूळे ओठ होऊ शकतात काळे, तुम्‍ही तर करत नाही ना ? जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गुलाबी ओठांचे आकर्षण सर्वांनाच असते. महिला तर आपल्या ओठांचे सौंदर्य जपण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. ओठ गुलाबी, लाल दिसावेत म्हणून त्या बाहेर पडताना लिपस्टिक सुद्धा लावतात. ओठांचा नैसर्गिक लाल, गुलाबी रंग कधी-कधी काळा पडतो. यामागे अनेक कारणे असतात. दिवसभरात आपण ज्या चूका करतो यामुळे ओठ काळे पडतात. या चूका कोणत्या ते आपण जाणून घेणार आहोत.

१ जास्त सिगारेट ओढणे
सिगारेटमधील निकोटीन ओठांच्या त्वचेला जाळते. यामुळे ओठ काळे पडू लागतात.

२ जास्त कॉफी पिणे
दिवसातून दोन ते तीन कप कॉफी पिणे ठिक आहे. परंतु, त्यापेक्षा जास्त कॉफी प्यायल्यास कॉफीनमुळे ओठ काळे पडू लागतात.

३ अ‍ँटीबायोटिक औषधे
जास्त काळ अँटीबायोटिक औषधे घेतल्याने शरीरावर याचा परिणाम होतो. ओठ हळूहळू काळे पडू लागतात.

४ केमिकल्स प्रॉडक्टचा वापर
केमिकल्सयुक्त लिप बामचा ओठांवर वापर केल्यास ओठ काळे पडतात.

५ पाणी कमी पिणे
कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होते. यामुळे ओठ सुकतात आणि काळवंडतात.

६ ओठ चावणे
काहींना ओठ आपल्याच दातांनी चावण्याची सवय असते. यामुळे ओठ कोरडे पडतात आणि काळे होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु