दीर्घकाळापर्यंत तरुण आणि सुंदर राहण्याचे रहस्य ! खास तुमच्यासाठी

दीर्घकाळापर्यंत तरुण आणि सुंदर राहण्याचे रहस्य ! खास तुमच्यासाठी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – त्वचेला अंतर्गत पोषण देण्यासाठी काही खास उपाय केल्यास त्वरित आणि दीर्घकाळापर्यंत फायदा होऊ शकतो. यासाठी दुध आणि मधाने स्नान करणे सर्वात उत्तम पर्याय आहे. मधामध्ये अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-ऑक्सीडेंट, अँटी-फंगल हे गुण असल्याने त्वचा कोमल होते. दुधामध्ये विविध प्रकारचे मिनिरल्स आणि व्हिटॅमिन ए, बी, डी, कॅल्शियम, लॅक्टिक अ‍ॅसिड असते. मध आणि दुध एकत्रित वापरल्यास त्वचा नरम होते आणि उजळते.

हे उपाय करा

* दुध आणि मध मिसळून स्नान करा. यामुळे त्वचा कोमल राहते. दुधामधील प्रोटीन आणि फॅटचे प्रमाण त्वचेला आतून एक्सफोलिएट करण्याचे काम करते. या व्यतिरिक्त दुधातील लॅक्टिक अ‍ॅसिड मृत पेशींना दूर करण्याचे काम करते.

* स्किन अ‍ॅलर्जीपासून दूर राहण्यासाठी मध आणि दुधाने स्नान करणे फायदेशीर ठरते. तसेच यामुळे त्वचेचे अंतर्गत पोषण होते. इन्फेक्शनची समस्या दूर होते.

* दुध आणि मध दोघांमधेही अँटी मायक्रोबोइल गुण आहे. यातील या गुणामुळे जास्तीत जास्त ब्युटी प्रोडक्टमध्ये यांचा वापर केला जातो. हे मिश्रण त्वचेची कोमलता कायम ठेवते. वृद्धावस्थेपासून दूर ठेवते. सुरकुत्या दूर होतात.

* मध आणि दुध एकत्रितपणे घेतल्यास थेट नर्वस सिस्टमवर प्रभाव पडतो. दुध त्वचेला कोमल बनवते तर मध त्वचेला पुन्हा नवजीवन प्रदान करण्यात सक्षम आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु