‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चमकदार चेहऱ्यासाठी महिला विविध उपाय नेहमीच करत असतात. यासाठी ब्युटी पार्लरमध्ये त्या भरपूर पैसेही मोजतात. मात्र, अनेकदा ही चमक अल्पकाळच राहते. त्वचा तजेलदार करण्यासाठी योग्य आहारही खूप महत्वाचा असतो. धावपळीच्या जीवनात त्वचेकडे लक्ष देता येत नाही. यामुळे त्वचा सुकते. यासाठी काही घरगुती रामबाण उपाय करता येऊ शकतात. या उपायाने चेहरा चमकतो आणि सुंदरही दिसतो.

हे आहेत रामबाण उपाय
चेहरा तजेलदार होण्यासाठी दोन छोटे चमचे बेसनपीठात दोन चमचे हळद मिसळावी. या मिश्रणात दहा थेंब गुलाब जल आणि दहा थेंब लिंबाचा रस मिसळून हलवावे. त्यानंतर कच्च्या दुधात मिसळून त्याचा थोडा पातळ लेप बनवावा. हा लेप आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर लावावा. अर्धा तासाने चेहरा पाण्याने धुवावा.

* डोळ्याखालील काळी वर्तूळे घालविण्यासाठी बटाटा कापून त्याने हलक्या हाताने मालिश करावे. काही दिवसाने काळे वर्तूळ दुर होतात.

* रोज कमीत-कमी आठ ते दहा ग्लास पाणी दिवसभरात पिल्याने त्वचेवरील सुरकत्या नष्ट होतात आणि चेहरा चमकदार होतो.

* निरोगी त्वचा आणि स्वस्थ शरीरासाठी रोज कमीत-कमी ८ तास झोप घ्यावी.

* अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असल्याने त्याच्या तेलाने मालिश केल्याने चेहरा चमकदार होतो.

* चेहरा उजळण्यासाठी संत्र्याचा ज्यूस नियमित प्यावा. संत्र्याची साल वाळवून त्याची पेस्ट लावावी.

* ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर असल्याने त्याचे नियमित सेवन करावे. त्वचेवरील डाग नष्ट होतात.

* डाळिंबामध्येसुध्दा अँटीऑक्सिडेंट भरपूर असल्याने त्याच्या नियमित सेवनाने तारूण्य टिकते.

* डाळींमध्ये जीवनसत्त्वे भरपूर असल्याने जेवणात रोज डाळींचा सामावेश केल्यास त्वचा चमकदार बनते.

* घराबाहेर पडताना सनस्क्रिन लावल्याने सूर्याच्या किरणांनी त्वचेच्या रंगात फरक पडतो.

* रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास गाजराचा ज्यूस पिल्याने त्वचेचा रंग उजळतो.

* चेहरा उजळण्यासाठी एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाच्या रसाचे मिश्रण लावावे.

* मुल्तानी मातीमध्ये गुलाब जल मिसळून लावल्यानेसुध्दा त्वचा चमकू लागते.

* चार-पाच लिंबाचे पान मुल्तानी मातीमध्ये टाकून त्याला चांगले घोटून घ्यावे. हा लेप लावल्यानंतर पंधरा मिनीटांनी चेहरा धुवावा. यामुळे चेहरा उजळतो. लिंबाची पाने त्वचेची रोग प्रतिकार शक्ती वाढवतात.

* केळीने चेहऱ्यावरील सुरकत्या नष्ट होतात. पिकलेल्या केळीची पेस्ट करून चेहरा चमकतो.

* चेहरा उजळण्यासाठी १/२ चमचा चिरंजी २ चमचे दुधात भिजवावी. काही तासांनी घोटून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट १५ मिनीट लावून ठेवा. हा पॅक नियमित दीड महिने लावावा.

* सातूचे पीठ, हळद, मोहरीचे तेल पाण्यामध्ये मिसळून त्याने रोज त्वचेची मालिश करून गरम पाण्याने आंघोळ करावी.

* कच्चे दुध त्वचेसाठी खूप फायद्याचे असून त्याने चेहऱ्यावर मालिश करावी. सुकल्यानंतर त्यावर मीठ लावून हळूवारपणे मसाज करा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात.

* बेसनपीठ, हळद, लिंबू, गुलाब जल यांना एकत्र करून लेप तयार करून आठवड्यातून एकदा लावावा.

* दोन चमचे काकडीचा रस, अर्धा चमचा लिंबूचा रस, थोडी हळद एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.

* एक चमचा मध चेहऱ्यावर हलक्या हाताने लावून १५-२० मिनीट ठेवावे. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. तेलकट त्वचेवर मधाचे चार-पाच थेंब, लिंबूचा रस हे सुध्दा चेहऱ्यावर लावू शकता.

* चार चमचे मुल्तानी माती, दोन चमचे दही, एका लिंबूचा रस हे सर्व एकत्र मिसळून त्वचेवर लावावे. हा अर्धा तास ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

* काकडीचा रस त्वचेचा काळा रंग दुर करण्यास मदत करतो. काकडीचा रस रोज १५ मिनीट लावावा. चेहरा उजळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु