ओठांना करा मऊ, मुलायम आणि गुलाबी, ‘हे’ आहेत घरगुती उपाय

ओठांना करा मऊ, मुलायम आणि गुलाबी, ‘हे’ आहेत घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चेहऱ्याचे सौंदर्य हे मऊ, मुलायम आणि गुलाबी ओठांमुळे आणखी खुलते. म्हणूनच सौंदर्य टिकवण्यासाठी ओठांकडे लक्ष द्यायलाच हवे. आकर्षक ओठांमुळे चेहरा नाजूक आणि उठावदार दिसतो. गुलाबी रंगाचे ओठ हे खास आकर्षित करणारे असतात. ओठांचा रंग काळा असेल आणि त्यांना मऊ, गुलाबी करायचे असल्यास काही घरगुती उपायांनी हे शक्य आहे.

या टीप्स फॉलो करा

* डाळिंब, लाल द्राक्ष यांचा रस ओठांवर लावल्यास ओठांचा काळेपणा दूर होतो.

* लिंबू आणि मध ओठांना लावल्यास फायदा होतो.

* जास्त चहा आणि कॉफीचे सेवन करु नये. कॉफीमध्ये कोफीन असल्याने ओठांचा रंग काळा पडतो. भरपूर पाणी प्यावे.

* उन्हाळ्यात त्वचा आणि ओठांवर काकडीचा रस लावल्याने काळे पडलेल्या ओठांचा रंग बदलण्यास मदत होते.

* कोरडे ओठ सोलू नये यामुळे ते काळे पडण्याची शक्यता दाट असते. बदाम आणि गुलाबाच्या पानांची पेस्ट एकत्र करुन लावल्यास फायदा होतो.

* प्रथम स्वस्त लिपस्टिक लावणे बंद करावे. लिपस्टिकची क्वालिटी चांगली नसेल तर तुमचे ओठ काळे पडण्याची शक्यता असते. मऊ आणि चांगल्या ओठांसाठी मॉइश्चराइजर रिच लिपस्टिक वापरावी.

* रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल ओठांवर लावावे.

* लिप बामचा वापर करा

* शुद्ध नारळाचे तेल आणि लिंबाचा रस ओठांचा रंग साफ ठेवण्यास मदत करते. उन्हात जाण्यापूर्वी होठांवर एसपीएफ-१५ युक्त लिप बाम लावावा. यामुळे ओठ काळे पडत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु