त्वचेसाठी वरदान आहे ‘केशर’ , जाणून घ्या कसा करावा ‘योग्य’ वापर

त्वचेसाठी वरदान आहे ‘केशर’ , जाणून घ्या कसा करावा ‘योग्य’ वापर

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सौंदर्यवर्धक केशर हा मसाल्यातील सर्वात महाग पदार्थ आहे.  खाद्यपदार्थ चविष्ट बनवण्यासाठी  केशराचा वापर केला जातो.  केवळ खाद्यपदार्थांमध्ये नाही, तर औषधी म्हणून, सौंदर्य प्रसाधानांमध्येही केशराचा वापर केला जातो. केशर हे त्वचेच्या सौंदर्यासाठी वरदान मानले जाते. केशराचा वापर करून चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्याचे काही उपाय आहेत. जाणून घ्या त्वचेच्या समस्यांवर केशरचा वापर कसा करावा याबद्दल –

१) त्वचेवरचे डाग, पिग्मेंटेशन घालवण्यासाठी केशराच्या काही काड्या थोड्या पाण्यामध्ये भिजवून त्यामध्ये दोन चमचे हळद घालून पेस्ट बनवा व चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका.

२) चेहऱ्यावर  मुरुमे पुटकुळ्यांची समस्या निर्माण झाली असेल तर तुळशीची पाने आणि केशराच्या काड्या पाण्यामध्ये भिजवून घ्या. नंतर त्यांची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा.

३) त्वचेवरचे टॅनिंग घालवायचे असेल तर अर्धा कप  कच्च्या दुधामध्ये केशर भिजत ठेवा. हे मिश्रण १५-२० मिनिटे त्वचेवर लावावे. यामुळे टॅनिंग जावून त्वचा चमकदार बनेल.

४) दोन चमचे चंदनाच्या पावडरमध्ये केशराच्या काड्या मिसळाव्यात. त्यामध्ये गुलाबजल घालून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याची त्वचा उजळेल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु