दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक जणांना काहीना काही व्यसन करण्याची सवय असते. त्यामुळे त्यांचे दात पिवळे होतात. दात पिवळे झाल्यावर त्यांना दिलखुलासपणे कुठेही हसता येत नाही. त्यामुळे ते सतत आपले दात शुभ्र कसे होतील यावर उपाय शोधत असतात. त्यांना दाताला नेमकं काय लावावं म्हणजे दात साफ होतील हेच कळत नाही.त्यामुळेच आम्ही त्यांच्या समस्येवर काही घरगुती उपाय सांगत आहोत. ते तुमचे दात शुभ्र करण्यास मदत करतील.

अगदी पूर्वीपासून हळद ही अनेक आजारांवर गुणकारी ठरली आहे. आपले दात जर पिवळे असतील तर यावरही हळद उपायकारी आहे. असे जर्नल ऑफ नॅचरल बायोलॉजी अँड मेडिसिन’ च्या संशोधनातून समोर आले आहे. हळद ही हिरड्यांच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहे. हळदीमुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होते. आणि आपल्या हिरड्यामध्ये जिवाणूंचे झालेले संक्रमण हे हळदीमुळे कमी होते.

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

हिरड्यातील जिवाणू नाहीसे झाल्यामुळे आपल्या हिरड्यांच्या समस्या कमी होतात. त्यामुळे भारतातच नाही. तर इतर देशातही हळदीचा औषधी उपयोग केला जातो. तसेच हळदीच्या मदतीने दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी दातांना हळद लावून दात शुभ्र करू शकता. त्यासाठी तुमच्या नेहमीच्या ब्रशने तुम्ही दातांना हळद लावा. ज्यांना हळदीची चव आवडत नाही. त्यांनी हळदीमध्ये पेपरमिंट घालून ते मिश्रण दातांना लावा. किंवा चिमूटभर हळदीमध्ये खोबरेल तेल, पाव चमचा बेकींग सोडा आणि एक थेंब पुदिना घालून ते मिश्रण दातांना लावा. दोन -तीन मिनिटाने चूळ भरावी. त्याने तुमचे दात शुभ्र होण्यास मदत होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु