पावसाळ्यामध्ये ‘अशी’ घ्या केसांची आणि त्वचेची काळजी

पावसाळ्यामध्ये ‘अशी’ घ्या केसांची आणि त्वचेची काळजी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यामध्ये  केसांची आणि त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे कारण त्यावेळी शरीरातील रोग प्रतिरोधक क्षमता कमी होते. त्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या समस्या जाणवू लागतात. पावसामुळे त्वचा ओली होते आणि चिकट होते  त्यामुळे खाज, लाल डाग, त्वचेवर पिंम्पल येतात. त्याचबरोबर पावसामुळे केस ही खराब होतात. त्यासाठी केसांची आणि त्वचेची काळजी घेतली पाहिजे.

image.png

हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये लोक आपल्या त्वचा आणि केसांची काळजी घेत असतात पण पावसामध्ये काळजी घेणे विसरतात. पावसाळ्यात तापमानात सारखे बदल होत असतात. त्यामुळे त्वचेमध्ये फरक जाणवू लागतो.  त्यामुळे इनफेक्शनची समस्या जाणवू लागतात. या दिवसात येणाऱ्या हवेत मोठ्या प्रमाणात दुषित कण असतात जे आपल्या त्वचेवर चिकटतात. त्याने स्किन इन्फेक्शन होते. पावसामुळे त्वचा खूपच कोरडी वाटत असेल तर ताज्या दहीमध्ये मध टाकून ते मिश्रण त्वचेवर लावा १० मिनिटे ठेवून ते धुवून टाका. त्यामुळे त्वचा तुमची सॉफ्ट राहील.

image.png

त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये केसांची तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे. पावसामुळे केसाची स्थिती खूप वाईट होते. अशामध्ये जर तुमच्या केसांना पोषक वातावरण मिळाले नाही तर केसांशी संबंधित अनेक समस्या वाढू लागतात. पावसाच्या पाण्यामुळे अनेक आजार सुरु होतात. मान्सूनमध्ये केसांची हानी ही सर्वात गंभीर समस्या आहे. यासोबतच या ऋतुमध्ये अनेक लोकांना कोंडा, केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

पावसामुळे केस ओले होतात ते कोरडे करण्यासाठी हे करा
पावसामध्ये आपल्याला भिजायला खूप आवडते. पावसाचे पाणी अशुद्ध आणि अम्लीय असते त्यामुळे केस खराब होतात. त्यामुळे पावसामध्ये केस ओले झाल्यानंतर लगेच कोरडे करा. केस कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करु नका. त्याएवजी टॉवेलचा वापर करा. पावसापासून केसांचा बचाव करायचा असेल तर छत्रीचा वापर करा.

पावसाळ्यामध्ये केसांची तेलाने मसाज करा
केसांना निरोगी ठेवण्यासाठी केसांना तेलाने मसाज करा. पावसाच्या पाण्यामुळे केसांमध्ये घाण जमा होते ते साफ करण्यासाठी तेल गरम करुन त्याने केसांच्या त्वचेला मसाज करा त्यानंतर १ तासाने केस धुवा. त्यामुळे आपली ड्राय स्काल्प मॉइश्चराइज होते. त्यामुळे केसांसाठी तेलाची मालिश करणे गरजेचे आहे.

image.png

पावसामध्ये केसाची काळजी घेण्याचे काही टिप्स

१. पावसाळ्यामध्ये केसांसाठी शॅम्पूचा वापर करा.
२. केसांची तेलाने मालिश करा.
३. केसांना कलर करु नका. त्यामुळे केस कमजोर होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु