‘या’ पद्धतींनी राखा केसांची निगा आणि मिळवा सुंदर केस

‘या’ पद्धतींनी राखा केसांची निगा आणि मिळवा सुंदर केस
आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  सगळयांना सुंदर स्टायलीश केस हवे असतात. पण कामाच्या गडबडीत आपण केसांचे व्यवस्थित आरोग्य राखू शकत नाही. आणि आपल्या केस खराब होतात. केसांना शाम्पू करायला ही आपल्याला जास्त वेळ नसतो. त्यामुळे केसांची योग्य निगा राखली जात नाही. पण तुम्ही जर खालील पद्धतीने  केसांची योग्य निगा राखली तर तुमचे केस सुंदर होतील.

१) केसांना शाम्पू करण्यापूर्वी केसांमधील गुंता कंगव्याने काढा. असं केल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होईल. आणि तुम्ही केसांना लावणारा शाम्पू हा योग्य पद्धतीने केसांना लावला  जातो.

२) केसांना शाम्पू लावायच्या अगोदर केस कोमट पाण्याने धुवा. त्यामुळे केसावर साचलेली धूळ निघून जाईल. आणि महत्वाचे म्हणजे हलक्या पाण्याने केस धुवा. असे केल्यास केस चांगल्या प्रकारे धुतले जातील.

३) शाम्पू लावतांना तो लगेच सगळ्या केसांवर टाकू नका. हातावर घेऊन मग सगळ्या केसांना लावा. त्याने केसांच्या मुळापर्यंत शाम्पू जाईल आणि केसांचे सगळे तेल निघून जाण्यास मदत होईल.

४) केस धुतल्यानंतर केसांमधील पाणी काढून टाका. आणि तुमच्या केसांना सूट होईल असं एखाद कंडीशनर केसांना लावा. थोडा वेळ ते तसेच ठेवा. आणि नंतर पाण्याने धुऊन काढा. केसांमध्ये कंडिशर राहणार नाही. याची काळजी घ्या.

५) ओल्या केसांना कंगवा लावू नका. त्यामुळे केस तुटतात.आणि केस पुसतानाही केसाची काळजी घ्या. टॉवेल जास्त जोरात फिरवू नका. अगदी हळुवारपणे केस पुसा. त्यामुळे केसांना राहिलेलं तेल निघून जाईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु