‘क्लीन शेव’ करताय ‘हे’ लक्षात ठेवा !

‘क्लीन शेव’ करताय ‘हे’ लक्षात ठेवा !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – क्लीन शेव करणे तसेच लांब दाढी ठेवणे हा आजकालचा ट्रेंड झाला आहे परंतु सगळ्यात जास्त प्रभावित करत ते क्लीन शेव असणे. तुमच्या प्रोफेशनल जीवनात तसेच जिथे तुमचे उठणे बसने असते तिथे तुमचा प्रभाव टाकते. पण तुम्ही दररोज क्लीन शेव करत असाल तर या काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

शेविंग करताना खालील गोष्टींची काळजी घ्या –

खरंच  दररोज शेव करणे गरजेचे आहे का ? तुम्हाला दररोज शेव करण्याची गरज आहे का आधी हे तपासलं पाहिजे कारण दररोज शेविंग केल्याने ब्लेड चे काळे डाग पडू शकतात तसेच त्वचेस आग ही होऊ शकते म्हणून शेविंग करण्याआधी ३० सेकंड  चेहऱ्याला वाफ द्या ज्यामुळे चेहऱ्यावरचे केस नरम होतील व रोमछिद्रे उघडे होतील यामुळे तुम्हाला लवकर शेव करता येईल व त्रासही होणार नाही.

शेविंग करताना गळ्याच्या खालच्या भागापासून सुरुवात करावी. शेविंग झाल्यानंतर चेहऱ्यावर आफ्टर शेविंग ही क्रीम वापरावी जेणेकरून तुमची त्वचा हायड्रेट व पोषित राहते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु