..अन्यथा ‘कंडीशनर’चा वापर ठरेल केसांसाठी हानिकारक

..अन्यथा ‘कंडीशनर’चा वापर ठरेल केसांसाठी हानिकारक

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजकाल केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ताणतणाव , बदलेली आहारपद्धती, प्रदूषण या सगळ्यांचा मोठा परिणाम केसांच्या आरोग्यावर होत आहे. केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. केसांचा रुक्षपणा जण्यासाठी अनेकजण कंडीशनरचा वापर करतात. मात्र याचा वापर करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी अन्यथा केसांचे नुकसानच होऊ शकते.

..अन्यथा ‘कंडीशनर’चा वापर ठरेल केसांसाठी हानिकारक

योग्य शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा –

काहींचे केस तेलकट असतात तर काहींचे कोरडे. प्रत्येक केसांसाठी एकच कंडीशनर असत नाही. केसांनुसार त्यासाठी योग्य त्या शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा.अन्यथा केसाचं अधिक नुकसान होईल.

अतिवापर टाळा

कंडीशनर आणि शॅम्पूसारख्या प्रोडक्ट्समध्ये अनेक केमिकल्सचा वापर करण्यात आलेला असतो. त्यामुळे जर तुम्ही यांचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केलात तर त्यामुळे केसांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक शॅम्पू आणि कंडीशनरमध्ये कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरणारे कोकामाइड डाईइथेनोलामाइन हे केमिकल असते. त्यामुळे याच्या अतिवापरामुळे आजार होण्याची शक्यता असते.

मॉइश्चराइजिंग शॅम्पू आणि कंडीशनर एकत्र वापरू नये –

शॅम्पू आणि कंडीशनर एकाच ब्रँडचे असावेत. तुम्ही शॅम्पूची निवड तुमच्या टाळूची त्वचा, केसांचा प्रकार, केमिकल ट्रीटमेंट यांनुसार करावी. मात्र मॉइश्चराइजिंग शॅम्पू आणि कंडीशनर दोन्हींचा वापर केल्यामुळे केसांच्या समस्या वाढू शकतात.

त्वचेची हानी होते-

केस धुतल्यानंतर कंडीशनर केवळ केसांच्या टोकांना लावावे. मात्र काही जण कंडीशनर त्वचेवर आणि टाळूवरही लावतात किंवा केस धुताना चुकून लागले जाते. कंडीशनर तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले केमिकल्स शरीरासाठी अत्यंत घातक असतात. त्यामुळे कंडीशनरचा वापर जपूनच करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु