सुंदर दिसण्यासाठी हा स्वस्त आणि मस्त उपाय आवश्य करा, जाणून घ्या हे आहेत ८ फायदे

सुंदर दिसण्यासाठी हा स्वस्त आणि मस्त उपाय आवश्य करा, जाणून घ्या हे आहेत ८ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळा आणि हिवाळ्यात वातावरणात बदल झाल्याने अनेक आजार पसरतात. सर्दी-पडसे आणि कोरडी त्वचा या समस्या होतात. परंतु वाफ घेतल्याने या समस्या दूर होऊ शकतात. एवढेच नव्हे तर वाफ घेतल्याने तुमचे सौंदर्य सुद्धा खुलून दिसेल. रोज किंवा आठवड्यातून ३ वेळा वाफ घेतली तर आरोग्याचे अनेक फायदे होऊ शकतात. हे फायदे कोणते ते आपण जाणून घेणार आहोत.

अशी घ्या वाफ
वाफ घेण्याची मशीन नसेल तर एका भांड्यात तीन किंवा चार ग्लास पाणी घेवून ते गरम करून घ्या. डोक्यावर कॉटनचा टॉवेल टाकून भांड्यावरील झाकन काढून पाच ते दहा मिनिटे वाफ घ्या. आठवड्यातून तीन ते चार वेळा वाफ घेऊ शकता.

वाफेचा असा होतो परिणाम
गरम पाण्याची वाफ नाकातून शरीरात जाऊन उष्णता निर्माण करते. आणि खराब बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे कफ किंवा सर्दीमध्ये आराम मिळतो. स्किन पोर्स ओपन झाल्याने त्यातील घाण बाहेर पडते. यामुळे चेहरा सुंदर दिसतो. त्वचा निरोगी होते.

हे होतील फायदे

कोरडी त्वचा मऊ होईल

सर्दी-पडशापासून बचाव होईल

त्वचेची चमक वाढेल

तारूण्यपिटीका दूर होतील

दम्याची समस्या दूर होईल

ब्लॅक हेड्स दूर होतील

त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट होतील

सुरकुत्या कमी होतील

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु