सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्पा करण्याचे अनेक फायदे आहेत परंतु, पूर्वी काही ठिकाणीच केला जात असे. आणि त्याला खर्चही खूप असल्यामुळे अनेकजण इच्छा असूनही स्पा करत नाहीत. सध्या तर कोणत्याही पार्लरमध्ये स्पा केलं जातो. परंतु, पार्लरमध्ये खर्च जास्त असल्यामुळे व वेळेअभावी आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाही. आपला खर्च आणि वेळ वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला स्पा करण्याच्या काही घरगुती टिप्स देत आहोत. त्या फॉलो करून तुम्ही सुंदर आणि ग्लोइंग त्वचा करू शकता.

 स्पा करण्याच्या घरगुती टिप्स खालीलप्रमाणे 

१) आयुर्वेदिक थेरेपी : आपण घरच्या घरी आयुर्वेदिक थेरेपी करू शकतो. यात औषधी वनस्पतीपासून बनवलेल्या आयुर्वेदिक तेलाने मसाज करू शकता. यासाठी तुम्ही अरोमा तेलाचा उपयोग करू शकता.

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

२) डोळ्यांचा स्पा : डोळ्यांचे खालचे डार्क सर्कल आणि डोळ्यांचा तणाव कमी करण्यासाठी आपण डोळ्यांचा स्पा करणे आवश्यक आहे.

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

३) बॉडी स्पा : तुम्हाला जर पाठदुखी किंवा मानदुखीचा आजार असेल तर तुम्ही बॉडी स्पा करू शकतो. बॉडी स्पामध्ये ऑइल मसाज, एरोमा थेरेपी, प्युरिफाईंग फेशियल या ट्रीटमेंट्स करतात. यात अगोदर त्वचा साफ करतात. यांनतर बॉडी मसाज केला जातो. नंतर स्टीम आणि नंतर शॉवर देतात. तुम्हाला जर घरी स्पा करायचा असेल तर तुम्ही टबमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात शॉवर जेल आणि चमचे सी सॉल्ट टाका. त्यानंतर ऍरोमॅटिक ऑईलने पूर्ण शरीरावर १५ ते २० मी मसाज करा.

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

४) चॉकलेट स्पा : डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, कोको चॉकलेटचा तुम्ही स्पा करू शकता. डार्क चॉकलेट ने स्पा केल्याचे खूप फायदे पण होऊ शकतात. चॉकलेटच्या वासाने डिप्रेशनची समस्या दूर होते. त्यामुळे चॉकलेट स्पा करणे खूप फायद्याचे आहे.

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

५) साल्ट स्पा : तुम्हाला जर खूप घाम येत असेल तर तुम्ही मिठाचा स्पा करू शकता. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल. हा स्पा तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. त्यासाठी तुम्ही साधं मीठ घ्या. स्पा करण्यासाठी बाजारात अरोमा सॉल्ट, सी सॉल्ट मिळत. यामध्ये दही मिसळून मसाज करा. त्यात तुम्ही ऑलिव्ह किंवा आल्मन्ड ऑइल पण मिसळू शकता. अशाप्रकारे जर तुम्ही स्पा केला तर तुमची घामाची समस्या सुटू शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु