चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरातील पाणी कमी झाल्याने त्वचा आक्रसते. त्वचेवर सुरकुत्या पडतात. यासाठी अ‍ॅँटीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ सेवन करणे गरजेचे आहे. यामुळे वयाच्या वाढीचा वेग कमी होतो. तसेच त्वचेवरच्या सुरकुत्याही कमी होतात. जेवणात विविध रंगी अन्नपदार्थांचा समावेश करावा.

हे ५ उपाय करा

१) रंगीत भाज्या आणि फळे नियमित सेवन करा. जेवणात जास्तीत जास्त रंगीत अन्नपदार्थांचा समावेश करा.

२) पौष्टिक पदार्थ खा. रासायनिक पदार्थ टाळा. ऑरगॅनिक फूडकडे वळा. यामुळे त्वचेचे सौंदर्य खुलून येईल.

३) डिहायड्रेट होऊ नका. शरीरातील पाणी कमी झाल्याने त्वचेवर परिणाम होतो. त्वचा आक्रसते व सुरकुत्या पडतात.

४) अ‍ॅँटीऑक्सिडंट्स भरपूर असणारे अन्नपदार्थ सेवन करा. यामुळे वयाच्या वाढीचा वेग कमी होईल. त्वचेवरच्या सुरकुत्याही कमी होतील.

५) डाळींब, पालक, ग्रीन टी, हिरवी द्राक्षे हे पदार्थ यासाठी उपयुक्त आहेत.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु