नाजूक ओठांची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या

नाजूक ओठांची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ओठ हा चेहऱ्यावरील महत्वाचा भाग आहे. त्याचे सौंदर्य राखण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. मात्र, अनेकदा वातावरणाचा ओठांवर परिणाम होत असतो. कोरड्या वातावरणात ओठ कोरडे पडून सालं निघतात. शिवाय, थंडीतही अशीच समस्या जाणवते. ओठांची त्वचा सर्वात कोमल असल्याने थंड आणि कोरड्या वातावरणात ओठांची विशेष काळजी घेतली पाहिजे. अधिक थंडीमुळेच नव्हे तर अधिक उष्णतेमुळेही ओठ उकलतात. या त्रासापासून सुटका करून घ्यायची असल्यास काही घरगुती उपचाय करता येतील. यामुळे ओठांच्या या समस्येत आराम पडू शकतो.

ओठांना थंडीपासून वाचवण्यासाठी नेहमी व्हॅसलीन वा पेट्रोलियम जेली लावत राहीले पाहिजे. असे केल्याने ओठ कोरडे पडणार नाहीत. ओठांवर नेहमी तूप लावून झोपावे. त्यामुळे ओठ नरम राहतील आणि उकलण्याची भीती राहणार नाही. वारंवार ओठांना जीभ लावण्याच्या सवयीमुळे नैसर्गिक ओलावा कमी होऊन ओठ उकलण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे ही सवय बंद केली पाहिजे. फाटलेल्या ओठांची त्वचा कधीही ओढू नका. त्यामुळे ओठ आणखी उकलू शकतात.

त्यामुळे रक्त निघण्याचा व इतर संसर्गाचा धोका वाढतो. आहारात ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे ओठ उलण्याची समस्या उद्भवू शकते. झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावल्यास ओठांची कोमलता कायम ठेवता येते. तसेच उललेल्या ओठांपासूनही सुटका होते. रात्री नेहमी लिपस्टिक साफ करूनच झोपायला हवे आणि भरपूर पाणी प्यावे, जेणेकरून ओठ उकलणार नाहीत. अशाप्रकारे काळजी घेतल्यास ओठ कुठल्याच वातावरणात उकलणार नाही. आणि ओठांचे सौंदर्य अबाधित राहिल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु