अन्नाची रुची वाढवणारा ‘हा’ पदार्थ खुलवतो तुमचे सौंदर्य, जाणून घ्या

 
अन्नाची रुची वाढवणारा ‘हा’ पदार्थ खुलवतो तुमचे सौंदर्य, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सगळ्यांनाच सुंदर दिसायचे असते आणि यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्ट्स चा वापर करतात . पण या ब्युटी प्रॉडक्ट्स चा वापर करत असताना अनेकांना याचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम माहितही नसतात पण आपल्या दैनंदिन वापरातले स्वयंपाक घरातील काही पदार्थ सौंदर्यवर्धक असतात. तसेच त्यांचे दुष्परिणामही होत नाहीत. आपल्या रोजच्या वापरातले मीठ हे जशी पदार्थाची चव वाढवते त्याचप्रकारे डागविरहित, चमकदार त्वचेसाठी खूप जादुई ठरते. जाणून घेऊया मिठाचे फायदे.

१. उन्हाळ्यात त्वचेची चमक नाहीशी होते. उन्हामुळे त्वचा खूप लवकर डेड होते. निस्तेज झालेल्या त्वचेवर मीठ उपयुक्त ठरते. मीठाच्या वापरामुळे डेड सेल्स दूर होतात. मीठात ऑलिव्ह ऑईल, लव्हेंडर ऑईल, बदाम तेल घालून चेहऱ्यावर स्क्रब करा. काहीच मिनिटात याचा फरक दिसू लागेल. त्वचा स्वच्छ होईल. त्याचबरोबर मऊसूत आणि चमकदार होण्यास मदत होईल.

२. फक्त त्वचेची चमक परत आणण्यासाठीच नाही तर दातांची चमक टिकून ठेवण्यासाठीही मीठ अतिशय फायदेशीर आहे. यासाठी १ चमचा मीठात २ चमचे बेकिंग पावडर घाला. या मिश्रणात टुथब्रश घालून ते दातांवर लावा. असे नियमित केल्याने काही दिवसातच दातांचा पिवळेपणा दूर होईल.

३. तोंडातील जिवाणू नष्ट करण्यासाठी तसेच दुर्गंधी घालवण्यासाठी मिठाचा उपयोग होतो.

४. नखं चमकवण्यासाठीही मीठ फायदेशीर ठरते. १ चमचा मीठात चमचाभर लिंबाचा रस, बेकिंग सोडा आणि अर्धा कप कोमट पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट नखांवर लावा. काहीच दिवसात नखांना चमक येते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु