‘या’ फुलांमुळे तुमची त्वचा राहू शकते निरोगी, जाणून घ्या

‘या’ फुलांमुळे तुमची त्वचा राहू शकते निरोगी, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाइन टीम :  त्वचा सुंदर असेल तरच तुमचे सौंदर्य खुलून दिसते. त्वचेचे आरोग्य जपण्यासाठी विविध पारंपारिक औषधे आहेत. त्यापैकी फुलांचा उपाय सुद्धा रामबाण आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फुलांचा कसा उपयोग होतो, व कोणती फुले यासाठी उपयोगी आहेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

झेंडू
यात औषधी गुणधर्म आहेत. यामुळे त्वचेचा दाह, लाली कमी होते. थकलेल्या स्नायूंना विश्रांती मिळते. बुरशीच्या संसर्गामुळे येणारी सूज, जळजळ यापासून आराम मिळतो. विविध त्रासापासून त्वचेचे रक्षण करते. कोरडी त्वचा, भेगा पडलेल्या टाचा, डागांमुळे त्वचेचा बिघडलेला पोत, चुकीच्या पद्धतीने झालेली केसांची वाढ, सूर्यकिरणांमुळे झालेले त्वचेचे नुकसान, पुरळ यासारख्या त्रासांवर झेंडूची फुले गुणकारी आहेत.

जास्मिन
याचा सुगंध नैसर्गिक कामोत्तेजक आहे. त्वचेसाठी हे गुणकारी असून दाहनाशक, जंतुनाशक आहे. यामुळे त्वचा सुंदर, तजेलदार आणि नितळ राहते. मनही शांत होते. स्ट्रेच मार्क तसेच डाग कमी करते. त्वचेचा पोत सुधारते. कोरडी त्वचा शांत करते.

लॅव्हेंडर
हे फूल त्वचेचा दाह, पुटकुळ्या, जळजळ, अनिद्रा यावर उपयुक्त आहे. त्वचेवरील दाह कमी होतो. रक्तप्रवाह सुधारते. त्वचेवरील विषघटक नष्ट करते, थकलेल्या स्नायूंना नवसंजीवनी मिळते. चांगली झोप लागते.

रजनीगंधा
हे प्रभावी कामोत्तेजक आहे. शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि रोमँटिक भावना जागवण्यासाठी ते उपयुक्त ठरते. रजनीगंधाचे तेल बर्गमोट, क्लॅरी सेज, फ्रँकिन्सीन, जेरानियम, लॅव्हेंडर, गुलाब अथवा चंदनाच्या तेलात मिसळून चांगल्या प्रतीचे तेल मिळवता येते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु