स्किन प्रॉब्लममुळे चेहरा डल झालाय का ? व्हाइटहेड्स दूर करण्याचे सोपे उपाय

स्किन प्रॉब्लममुळे चेहरा डल झालाय का ? व्हाइटहेड्स दूर करण्याचे सोपे उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पिंपल्स, ब्लॅक हेड्स, व्हाइट हेड्स येण्याची समस्या तरूण-तरूणींना नेहमीच सतावत असते. या स्किन प्रॉब्लममुळे चेहरा डल होत असतो. शिवाय, व्हाइट हेड्समुळे चेहरा अधिकच खराब दिसतो.

ही समस्या टाळण्यासाठी जास्त पाणी प्या, भाज्या, फळे, व्हिटॅमिन ई, ए आणि सी युक्त पदार्थांचे सेवन करा, डोक्यात कोंडा झाला असेल तर डोके स्वच्छ ठेवा, व्हाइट हेड्स फोडल्याने पिंपल्स येतात, फास्ट फूडचे सेवन कमी करावे, आदी काळजी घेतली पाहिजे. व्हाइट हेड्स घालवण्यासाठी आणखी काही उपाय आपण जाणून घेणार आहोत.

कॉर्न स्टार्च
तीन चमचे कॉर्न स्टार्च १ चमचा व्हाइट व्हिनेगरमध्ये मिक्स करा आणि पेस्ट बनवा. हे प्रभावित भागावर लावा आणि १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.

तांदळाचे स्क्रब
मुठभर तांदुळ घ्या आणि ५ तासांसाठी पाण्यात भीजवा. नंतर याची पेस्ट बनवा आणि स्क्रब प्रमाणे याचा उपयोग करा.

एलोवेरा जेल
चेहरा पाण्याने धुतल्यानंतर एलोवेरा जेल लावा. यामुळे व्हाइट हेड्स नष्ट होतील.

पाणी
रोज ३ लीटर पाणी प्या. जर चेहरा ऑयली असेल तर दिवसातून अनेक वेळा चेहरा धुवा.

अंडी आणि मध
अंड्याच्या पांढरा भाग १ चमचा मधासोबत मिक्स करा. हे लावल्याने व्हाइट हेड्स स्वच्छ होतील. २० मिनिट लावुन ठेवल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.

अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर
अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर व्हाइट हेड्सला कोरडे करते. गरम पाण्याने वाफ दिल्यानंतर कापसावर थोडे अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर घेवून लावा. यानंतर थोडा वेळ चेहरा धुवू नका.

टी बॅग
चहा बनवल्यानंतर टी बॅग फेकु नका. तर यामधील चहा पावडर काढून व्हाइट हेड्सवर लावा. आठवड्यातून २ वेळा असे केल्याने व्हाइट हेड्स नष्ट होतील.

लिंबू
लिंबूचा रस हलक्या हाताने लावल्याने यातील अ‍ॅसिड पोर्सला उघडते. तसेच व्हाइट हेड्सला बाहेर काढते. लिंबूचा रस ऑयली स्किनवर लावल्याने स्किन नॉर्मल होते. ज्यामुळे व्हाइट हेड्स नष्ट होतात.

दूध
२ चमचे दूध, १ चमचा लिंबूचा रस आणि मीठ मिक्स करा. या मिश्रणाने हलक्या हाताने मसाज करा. २० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

मध
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइट हेड्स दोन्हीही स्वच्छ होतात. मध १० मिनिटे लावून ठेवा. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु