केसांचे सौंदर्य खुलावण्यासाठी आवश्य करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

केसांचे सौंदर्य खुलावण्यासाठी आवश्य करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच केसांचे सौंदर्य सुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरते. धकाधकीचे जीवन व पर्यावरणातील प्रदुषणामुळे केस गळण्याचा त्रास सुरू होतो. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंपैकी पावसाळ्यात केस गळण्याचे प्रमाण जास्त असते. पावसाळ्यात पाण्यात क्लोरिनचे प्रमाण वाढलेले असल्याने केसगळती होते. यामुळे केसांची काळजी घेतली पाहिजे. काही घरगुती उपाय केल्याने केसाचे सौंदर्य वाढवण्यासाठी नक्कीच मदत होते.

कधी-कधी बाजारातील प्रॉडक्ट्सचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच होते. केस गळण्याचे प्रमाण वाढते. यामुळे केसांची निगा राखण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती आपण करून घेणार आहोत.

१) केळी केसासाठी लाभदायक आहेत. केळीच्या गरामध्ये मधाचे काही थेंब टाकून पेस्ट तयार करून ती केसांना लावावी. अर्ध्या तासाने केस स्वच्छ करावेत. केसाला चकाकी येण्याबरोबरच केस मजबुत होतात.

२) एक कप बीयर पातेल्यात उकळावी. यामुळे अल्कोहोलची वाफ होते. बीयर थंड झाल्यानंतर अर्धाकप शांपू त्यामध्ये टाकावा. हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरून ठेवावे. केस धुण्यासाठी याचा वापर केल्यास केस चमकदार व सुंदर होतात.

३) नारळाच्या तेलात लींबू, तुळस, शिकाकाई, आवळ्याची पाने टाकून उकळून घ्यावीत. या तेलाने केसांची मालीश केल्यास केस लांबसडक, मजबूत व चमकदार होतात.

५) शांपूने केस धुतल्यानंतर बीयरचे काही थेंब पाण्यामध्ये टाकून केस स्वाच्छ करावेत. बीयरमुळे केसांना चमक येते, केस मजबुत होतात. केस चमकदार आणि सिल्की करण्यासाठी केस धूण्यापुर्वी दही लावावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु