‘चिरतारूण्य’ हवंय तर चहा प्या ! अनेक आजारांपासून मिळेल मुक्ती

‘चिरतारूण्य’ हवंय तर चहा प्या ! अनेक आजारांपासून मिळेल मुक्ती

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चहा आरोग्यसाठी हानीकारक आहे. दिवसभरात चार ते पाच कपांपेक्षा जास्त चहा पिणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसेत. परंतु, दुध, चहापत्ती आणि साखरेच्या नेहमीच्या चहापेक्षा जर तुम्ही खास प्रकारचा चहा नियमित घेतला तर आरोग्य चांगले राहू शकते. पूर्वी चहाच्या पानांचा आणि बियांचा औषधी म्हणून वापर केला जात असे. सध्या आपल्या दिवसाची सुरूवात चहानेच होते. परंतु, हा चहा जास्त प्रमाणात घेणे टाळावे. यासाठी खासपद्धतीने बनविलेला चहा घेतला तर शरीराला खूप फायदे होऊ शकतात. या चहातील औषधी गुणधर्मांविषयी जाणून घेवूयात.

धन्याची चहा
आरोग्य चांगले राहण्यासाठी राजस्थानमध्ये एक विशिष्ट प्रकारचा चहा घेतला. जातो. हा चहा बनविण्यासाठी धने वापरले जातात. यास धन्याची चहा असे म्हणतात. दोन कप गरम पाण्यात थोडे जिरे, धने, चहापत्ती आणि बडीसोफ टाकून हे मिश्रण दोन मिनीटे ढवळावे. चविनुसार यात साखर टाकावी. हा चहा प्यायल्यास गळ्याचे आजार, अपचन, गॅसचा त्रास दूर होतो.

मधाचा चहा

बस्तरमधील आदिवासी भागात मधाचा चहा बनविला जातो. या चहामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असल्याने तो आरोग्यसाठी लाभदायक आहे. यास शहदी चाय किंवा सैदी चहा सुद्धा म्हणतात. हा चहा बनविण्यासाठी दोन चमचे चहापत्ती, दोन चमचे मध आणि थोडेसे दूध एकत्र करून हे मिश्रण घोटावे. एक कप उकळत्या पाण्यात हे मिश्रण टाकून त्यामध्ये आदर टाकावे. अशापद्धतीने मधाची चहा तयार केली जाते. मध, चहा, आणि आदरकमध्ये औषधी गुणधर्म असल्याने हा चहा म्हणजे एक प्रकारचे टॉनिक आहे. हा चहा घेतल्याने उत्साह वाढतो.

मुलेठी चहा
मुलेठी म्हणजेच जेष्ठीमध होय. या चहामध्ये जेष्ठीमध टाकून बनवला जात असल्याने त्यास एकप्रकारचा वेगळाच सुगंध येतो. आपण साधी चहा बनवतो तसाच हा चहा बनवावा. परंतु, तो उकळत असताना त्यामध्ये चिमुटभर मुलेठी टाकावी. या चहाचा मस्त सुगंध दरवळतो आणि त्याची चवही चांगली असते. दमा आणि सर्दिचा त्रास असल्यास रोज दोन किंवा तिन वेळा हा चहा प्यावा. गुजरातमध्ये हा चहा जेष्ठीमध चहा तर मध्यभारतात मुलेठी चहा म्हणून ओळखला जातो.

अनंतमुली चहा
हा चहा बनविण्यासाठी अनंतमुलीची मुळे वापरली जातात. अनंतमुलीची मुळी, एक ग्रॅम सोफ, थोडी चहाची पत्ती गरम पाण्यात टाकून हे मिश्रण ढवळावे. या चहाच्या सेवनाने दमा आणि खोकल्याचा त्रास दूर होतो. शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी पातळकोटमधील आदिवासी थंड वातावरणात अनंतमुलीची चहा पितात. कारण अनंतमुली हे एक उष्णता निर्माण करणारे झाड आहे.

आंबट गवती चहा
गवती चहामध्ये लिंबू किंवा संत्र्याची साल टाकून हा तयार केला जातो. यात काही थेंब लिंबाचा रसही टाकला जातो. एका संशोधनानूसार गवती चहात लिंबू टाकून पिल्याने वय वाढण्याची प्रकिया मंदावते आणि तुम्ही चिरतरूण राहता. मध्यभारतातील गोंडवान क्षेत्रातील आदिवासी हा चहा पितात. अधुनिक विज्ञानानेही या चहाचे महत्व जाणले आहे.

मसाला चहा
काळे मिरे, सुंठ, तुळस, दालचिनी, इलाईची, लौंग, जायफळ, एकत्र करून बनविलेला मसाला टाकून हा चहा तयार केला जातो. चहाची पत्ती आणि दूध उकळून त्यात हा मसाला चिमुटभर टाकला की मसाला चहा तयार होतो. हा सुगंधी चहा शरीरात उत्साह निर्माण करतो. मन ताजेतवाने करतो. गुजरातमध्ये या चहाचे सेवन मोठ्याप्रमाणात केले जाते.

गवती चहा
हा चहा बनविण्यासाठी गवती चहाची दोन-तिन पाने चुरगळून, दोन कप पाण्यात उकळावीत. चविनुसार साखर घालून पाणी एक कप होईपर्यंत उकळावे. थोडेसे आदरकही टाकावे. तसेच लिंबू रसाचे काही थेंब टाकावे. या चहात दूध टाकू नये. गवती चहामध्ये अंटीओक्सीडंट गुण आसल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बुंदेलखडातील आदिवासी लोक हा चहा पितात.

काळी चहा
काळी चहा आपल्याकडे अनेकजण पितात. या गोड चहात दूध टाकले जात नाही. दोन कप पाण्यात एक चमचा चहाची पत्ती आणि तिन चमचे साखर टाकून पाणी उकळावे. यानंतर गाळून प्यावे. या चहामुळे मेंदू तरतरीत होतो आणि तणाव कमी होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु